जगातील सर्वात महागडा आंबा 'ताईओ नो तामागो'.. किंमत २ लाख रुपये किलो - जगातील सर्वात महागडा आंबा
🎬 Watch Now: Feature Video
आंबा प्रत्येकालाच आवडतो. परंतु आब्यांची चोरी रोखण्यासाठी जर दिवस रात्र सुरक्षा रक्षक श्वानांसह निगराणी करत असेल, तर या आंब्याचा गोडवा आणि दर्जा किती खास असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. आंब्याला फळांचा राजा म्हणतात. जगभरात भारतातील आंब्याला तोड नाही. मात्र, आम्ही आपल्याला जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल सांगणार आहोत. जो आंबा मूळचा जपानमधला आहे...या आंब्याची किंमत दोन लाख रुपये प्रति किलो इतकी आहे. नाही.. नाही.. तुम्हांला या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी जपानला जावे लागणार नाही. तर तुम्हांला हा आंबा जबलपूरमधील एका बागेतही मिळेल. या आंब्यांची चोरी होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक श्वानाच्या सोबतीने दिवस रात्र बागेची राखण करतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की जबलपूरमधील चारगाव रोडवर संकल्प परिहार आणि राणी परिहार यांची बाग आहे, या बागेत वेगवेगळ्या 14 प्रकारच्या आंब्याची झाडं आहेत.