Jayant Patil Resolution 2022 : 'जलसंधारणाचे नवीन प्रकल्प राबवण्यावर भर देणार' - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नवीन वर्षे संकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मागील २ वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जलसंपदा विभागाने ३४ प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. विशेष करून मराठवाड्याच्या बाबतीत 19.50 टक्के टीएमसी पाणी नव्याने उपलब्ध होऊ शकते. त्या पद्धतीचे बंधारे किंवा प्रोजेक्ट होऊ शकतात असे आम्ही केलेल आहे. असे अनेक प्रकल्प आमच्या विभागाने हाती घेतलेले आहेत. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून आधीच्या सरकारने किंवा आतापर्यंत या बाबतीत कधी विचारणा करण्यात आली नव्हती. परंतु अतिशय महत्त्वाची अशी भूमिका या मराठवाड्याच्या बाबतीत जलसंपदा विभागाने घेतलेली आहे. नवीन वर्षात अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असा संकल्प जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला आहे.