विनिशा उमा शंकर : 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या विरोधात कार्य करणारी लहानगी शास्त्रज्ञ - Vinisha Uma Shankar against Global Warming
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ग्लोबल वॉर्मिंग' हा विषय सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या प्रश्नांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शास्त्रज्ञ ग्लोबल वार्मिंगला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून नववीच्या वर्गात शिकणारी लहानगी शास्त्रज्ञ विनिशा उमा शंकर हिने 'सोलार आयरनिंग गाडी' तयार केली आहे. १२ वर्षाच्या विनिशाने 'सोलार आयरनिंग गाडी' तयार केली आहे. तिच्या याकल्पनेला तिच्या पालकांनी पाठिंबा अन् प्रोत्साहन दिले.