VIDEO : अन् कुत्र्याने हुसकावून लावले सिंहाला; व्हिडिओ व्हायरल.. - गीर कुत्रा सिंह व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
गांधीनगर : 'अपने इलाके में कुत्ता भी शेर होता है' हा संवाद तुम्ही हिंदी चित्रपटांमधून कित्येक वेळा ऐकला असाल. मात्र, गुजरातमध्ये एका कुत्र्याने चक्क सिंहाला त्याच्याच जंगलात हुसकावून लावल्याची घटना समोर आली आहे. राज्याच्या गीर अभयारण्यात काही पर्यटक फिरत असताना ही घटना घडली, आणि त्यांच्यापैकीच एकाने हे कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ कधीचा आहे, किंवा कोणी रेकॉर्ड केला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे...