'चांग' घर, जे हत्तीच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांचा बचाव करतं - chaang gher aasam

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 7, 2021, 9:21 AM IST

आपलं घर हा कायम जिव्हाळ्याचा विषय असतो. अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची घर ही महत्त्वाची गरज. मात्र, आसाममधील सुदूर गावात अद्यापही लोक उंचीवर उभारलेल्या अशा लाकडाच्या घरात राहतात. याला आसाममध्ये टोंगी घर किंवा चांग घर म्हटलं जाते. कार्बी आंगलोंग जिल्ह्याच्या सीमेवर 45 कुटुंबाचं बरमहारी पाथर गाव वसलेले आहे. जंगली भाग असल्याने येथे हत्तींचा वावर आहे. त्यामुळे येथील लोकांकडे चांग घरामध्ये राहण्याशिवाय दुसार पर्याय नाही. हत्तींच्या सतत हल्ल्यामुळे गावातील रहिवाशांना चांग घरामध्ये राहायला भाग पाडले आहे. जमिनीवर त्यांचे एक सामान्य घरही आहे. मात्र, हत्तींच्या कळपांपासून बचाव करण्यासाठी गावातल्या 45 कुटुंबांनी 'चांग' घर उभारले आहे. जंगलांच्या जवळ असलेल्या या गावात वन्य हत्तींचा कळप येणे, ही एक सामान्य गोष्ट आहे. गावातले लोक संध्याकाळी चांग घरावर चढतात आणि सकाळपर्यंत तिथेच मुक्कामी असतात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.