हे आहे राजस्थानमधील एकमेव कुंकवाचं झाड, ज्याला पवित्र मानून स्थानिक करतात पूजा - कुंकू बातमी
🎬 Watch Now: Feature Video
अजमेर (राजस्थान) - कुंकवाचे झाड, याला रोहिणी, शेंद्री तर इंग्रजीत वर्मिलियन ट्री म्हणूनही ओळखले जाते. हे झाड सामान्यतः हिमालय क्षेत्रात आढळते. मात्र, राजस्थानसारख्या उष्ण आणि वाळवंटी प्रदेशात याचे झाड लागणे हे दूर्मिळच म्हणावे लागेल. अजमेरच्या अशोक जाटोलिया यांच्या घरी हे झाड लागले आहे. कुंकू सौभाग्यवतींच लेण मानल जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी डोक्यात कुंकू लावतात. परंतु, कुंकू नैसर्गिक असून झाडापासून प्राप्त होते, याबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.