National Broadcast Day: 'श्रवणभक्ती, वाणी उत्तम असेल तर कुठेही संधीच' - पुणे आकाशवाणी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12543877-thumbnail-3x2-nashik-.jpg)
नाशिक - आपल्या जवळ श्रवणभक्ती असेल तर आपण भाषेवर प्रभुत्व मिळू शकतो. भाषेवर प्रभुत्व मिळवले की कोणत्याही क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी आहेत असे निवृत्त आकाशवाणी निवेदक हृषीकेश अयाचित यांनी सांगितले आहे.
23 जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात 1927 साली मुंबई आणि कोलकत्ता या दोन ठिकाणाहून खाजगी कंपनी अंतर्गत प्रसारणास सुरुवात झाली. 1930 मध्ये सरकारने ट्रान्समिटर प्रसारण सेवा स्वतःच्या ताब्यात घेतली. 1935 मध्ये यास भारतीय प्रसारण सेवा असे नाव देण्यात आले. आणि 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले. आताच्या काळात अनेक खाजगी रेडिओ स्टेशन सुरू झाले असले तरी आकाशवाणी आपला श्रोता वर्ग टिकवून आहे. आणि याच आकाशवाणी 30 वर्ष निवेदक म्हणून काम केलेले हृषीकेश अयाचित यांच्याशी ईटीव्ही भारतशी बातचीत केली. यावेळी अयाचित रेडिओ क्षेत्रात तरूणांना अनेक संधी असल्याचे सांगितले.