हात नसले म्हणून काय झालं? पाय बदलवणार भाग्य.. कृष्ण कुमारच्या जिद्दीची कहाणी
🎬 Watch Now: Feature Video
मऊगंज (मध्यप्रदेश) - मऊगंजच्या उत्कृष्ट शाळेत पहिल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृष्ण कुमारनं आपलं नाव मिळवलंय. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज १० किलोमीटर चालत जावं लागतं. एखाद्या हातानं लिहिणाऱ्याला लाजवेल असं पायात पेन पकडून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहितो. लिखाण पाहून हात नसल्याच्या दुर्बलतेवर त्यानं कधीच विजय मिळवलाय असं वाटतं. दिव्यांग असूनही १२ वीत गुणवंतांच्या यादीत चमकल्यानं परिसरात त्याचं कौतुक होतंय.