खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड - former Minister G Madegowda
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू- काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांनी जोरात थप्पड लगावली आहे. माध्यमातील वृत्तानुसार शिवकुमार हे मंड्यामध्ये माजी मंत्री जी. मंडेगौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेव्हा ही घटना घडली आहे.