Vava Suresh Snakebite : 50 हजार सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राला कोब्राचा दंश, मृत्यूशी लढतोय वावा सुरेश - kerala snake handler vava suresh
🎬 Watch Now: Feature Video
तिरुअनंतपुरम - देशभरात सुपरिचित असलेला वावा सुरेश या सर्पमित्राला कोबरा नागाने दंश ( vava suresh snakebite ) केला. कोबरा नागाला जीवदान देतानाच कुरुची येथे सोमवारी ही घटना घडली. त्यामुळे सर्पमित्र वावा सुरेश मृत्यूशी झूंज देत ( vava suresh health update ) आहे. त्याच्यावर कोट्यम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी कुरुची येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात नाग असल्याची माहिती येथील नागरिकाने वावा सुरेशला दिली होती. मात्र शनिवारी तो कामात व्यस्त असल्याने त्याने रविवारी येतो म्हणून शेतकऱ्याला सांगितले. मात्र रविवारीही वावा सुरेश कामात व्यस्त असल्याने जाऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी सकाळीच त्याने सदर शेतकऱ्याला कॉल करुन आपण सापाला रेस्क्यू करण्यासाठी सकाळी गावात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वावा सुरेशने त्या सापाला पकडून रेस्क्यू केले. मात्र थैलीत भरताना नागाने त्याला दंश केला. नागाच्या दंशाने वावा सुरेश अत्यवस्थ झाला असून त्याला कोट्ययमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही वावा सुरेश याला अनेक वेळा नागाने दंश केला होता. त्यामुळे चार वेळा तो आयसीयूत तर दोन वेळा तो व्हेंटीलेटरवर होता.