ईटीव्ही भारत विशेष : झारखंडमधील 'पलाश' फुले जगभरात दरवळणार..
🎬 Watch Now: Feature Video
रांची : छोट्याश्या खोलीत किंवा गॅरेजमध्ये तयार झालेल्या कंपन्यांनी कशा प्रकारे जागतिक स्तरावर कोट्यावधींची उलाढाल केली, हे आपल्याला माहीत आहे. अगदी तशाच प्रकारे झारखंडच्या विविध गावांमधील छोट्याशा घरांमध्ये तयार होणारी उत्पादने आता जगभरात पोहोचणार आहेत. रांचीच्या नामकुम प्रांतात अवघी ३०० घरे असणारे कुटियातू नावाचे गाव आहे. या गावातील शोभा दिदी ही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या संघर्षाची कथा सुरू होते, ती २००८ मध्ये. आपल्या सासरी पोहोचताच शोभा दिदींसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. यातील सर्वात मोठी समस्या होती, ती आर्थिक अडचण. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शोभा दिदींनी कंबर कसली. त्यांना बँकेचेही कर्जरुपी सहाय्य मिळाले. आणि मग सुरू झाली.. सुरण, कैरी, मिरची आणि कारल्याच्या लोणच्याची प्रेरणादायी कथा!