इंदुरने केला स्वच्छतेचा 'पंच' लावण्याचा निर्धार! - इंदुर स्वच्छ शहर व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ - मागील चार वर्षांपासून इंदुरने देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला आहे. 61 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याचा हा प्रवास अगदी एखाद्या मोहीमेप्रमाणे आहे. यावर्षी देखील पहिला क्रमांक मिळवण्यासाठी इंदुरच्या प्रशासनाने आणि नागरिकांनी कंबर कसली आहे. यावेळी नदी-नाल्यांची सफाई करण्यावर भर दिला आहे. यासाठी शहरात ट्रीटमेंट प्लँट तयार केले गेले आहेत. दुषित पाणी नद्यांमध्ये जाण्यापासून रोखले आहे. त्यामुळे नद्या पुन्हा स्वच्छ झाल्या आहेत. नाले पूर्णपणे कोरडे झाले आहेत.