शेतकरी आंदोलन : पोलिसांवरच पाण्याचा मारा, व्हिडीओ व्हायरल - कृषी कायदाविरोधी आंदोलन न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
शेतकरी आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक युवक वॉटर कॅननच्या गाडीवर चढून पोलिसांवर पाण्याचा मारा करताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांकडून संबधित युवकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, तो सलग पाण्याचा मारा पोलिसांवर करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडीवरून उडी घेतली आणि पळून गेला. माहितीनुसार व्हिडीओमधील संबधित युवकाचे नाव नवदीप आहे.