कोरोना विशेष वेबिनार : डॉ. जवाहर शहा यांच्याशी विशेष बातचीत - dr jawahar shah special interaction
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - मागील सात-आठ महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या वाढण्याचा दर कमी झाला. मात्र, अजूनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यात देशविदेशातील डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला. या वेबिनारमध्ये कोणकोणत्या उपचार पद्धतींवर चर्चा करण्यात आली?, या वेबिनारमुळे कोणाकोणाला कसा फायदा झाला, याबाबत वेबिनारमध्ये सहभागी झालेले डॉ. जवाहर शहा यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने विशेष संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले?