Atul Londhe On Kirit Somaiya : किरीट सोमैया कुठे पळाले? कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांचा सवाल - कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांचा सवाल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भाजपाचे नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांनी आयएनएस विक्रांत या जहाजासाठी पैसे जमवून ते अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपात संदर्भात अटक होण्याची शक्यता असल्याने ते पळून गेले असावेत अशी शंका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली ( Atul Londhe On Kirit Somaiya ) आहे. अपहार करायचे आणि पळून जायचे अशी मोठी परंपरा आहे. त्याच्यामध्ये नीरव मोदी पासून ते किरीट सोमैयापर्यंत नावे घेता येतील. देशाच्या सैनिकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार असून सोमैया यांनी हजर व्हावे. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत ऑडिटर vs काही आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांबाबत त्यांची चौकशी सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांवर दबाव टाकण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असला तरी पोलिस योग्य ती चौकशी करतील आणि गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल असा विश्वासही लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST