Tunnel Collapse Jammu : जम्मू-काश्मीर महामार्गावर बोगद्याचा भाग कोसळला: 4 जखमी, अनेकजण अडकले - बनिहाल बोगदा कोसळला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 20, 2022, 9:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

बनिहाल ( श्रीनगर)- रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बांधकामाधीन चार लेन बोगद्याचा ( jk tunnel collapse ) काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले ( tunnel on jk highway collapses in ramban ) आहेत. अनेकजण अडकले. गुरुवारी रात्री खोनी नाल्यातील बोगद्याच्या पुढील बाजूचा एक छोटासा भाग कोसळला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच पोलीस आणि सैन्यदलाने संयुक्त बचाव मोहीम ( ( police army launched joint rescue operation ) सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी अवस्थेत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अनेक जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. बोगद्यासमोर उभ्या असलेल्या बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम ( Rambans Deputy Commissioner Masratul Islam ) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा घटनास्थळी पोहोचले. ते बचाव कार्यावर देखरेख करत आहेत. ते म्हणाले की, बोगद्याच्या आत अडकलेले लोक बोगद्याचे ऑडिट करण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे आहेत. बनिहाल येथून अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.