Inter State Gang Arrested : दोन कोटी रुपये लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस दिंडोशी पोलिसांकडून अटकेत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : अंगाडीया असल्याचा बनाव करून दोन कोटी रुपये लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस दिंडोशी पोलिसांनी अटक केली ( Inter State Gang Arrested ) आहे. जगदीशप्रसाद पोद्दार या जेष्ठ नागरिकास आसाम याठिकाणी आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवाचे होते. मात्र या टोळीकडून लूट झाल्याची लक्षात येता दिंडोशी पोलिसांत ( Dindoshi Police Mumbai ) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास केलानंतर एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी मुरली कलबुर्गी याला बंगलोर येथून अमोल कांबळे यास धारावी, रुपीदर अरोरा यास गोवा, निसार अहमद तळोजा, इकबाल शेख यास डोंगरी येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत ५० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST