ETV Bharat / sukhibhava

World Water Day 2023 : जल है तो जीवन है, जाणून घ्या काय आहे जल दिनाचा इतिहास आणि महत्त्व - जनजागृती

पाणी मानवाचे जीवन असल्याचे संबोधले जाते. त्यामुळे मानव पाण्याशिवाय जगू शकत नाही. मात्र तरीही पाण्याचे स्त्रोत दूषित करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिन साजरा करण्याचे युनोने घोषित केले.

World Water Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 17, 2023, 3:21 PM IST

हैदराबाद : पृथ्वीचा ७३ टक्के भाग पाण्याने व्यापल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही देशात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब वाचण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतात. पाणी वाचवून ते साठवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी युनोच्या वतीने दरवर्षी २२ मार्चला जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे या दिनी जगभरात पाण्याचा वापर जपून करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

काय आहे जलदिनाचा इतिहास : पर्यावरणाच्या विकासावर रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांची 1992 मध्ये परिषद झाली. या दिवशी जागतिक जल दिनाची कल्पना सूचवण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासभेने याबाबतचा ठराव मंजूर करुन दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने २२ मार्च हा जल दिन म्हणून घोषित केल्यानंतर 1993 पासून जागतिक जल दिन साजरा साजरा केला जातो. जल दिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रमाचे 1993 पासून आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात येतात.

काय आहे जागतिक जल दिनाचे महत्वाचे : पृथ्वीवरील ९९ टक्के भूजल साठ्यांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. मात्र पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे या जल साठ्यांवर संकट कोसळले आहे. दुषित जल साठ्यांमुळे अब्जावधी नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे जलसाठे वाचवण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. देशातील अनेक जल साठे आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरणाचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. भूजल साठे प्रदूषित झाल्याने साथीचे रोग पसरत आहेत. लहान मुलांच्या पिण्यात प्रदूषित पाणी गेल्यामुळेच त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागते आहे. त्यामुळे आजाराचे मूळ हे दूषित पाण्यात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ मानतात.

हेही वाचा - World Sleep Day 2023 : चांगल्या आरोग्यासाठी आहे ६ तास झोप घेणे महत्वाचे, पुरेशा झोेपअभावी 'हे' होतात वाईट परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.