हैदराबाद : प्राण्यांचा मानवाला मोठा फायदा होत आहे. मात्र प्राण्यांच्या आरोग्याची देखभाल करणे गरजेचे असून त्यासाठी जागरुकता निर्माण करावी लागते. प्राण्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी जागतिक पशूवैद्यक संघटनेने अनेक प्रयत्न केले आहेत. प्राणी शेती, संस्कृती आणि जगण्याचा आधार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यातील शेवटच्या शनिवारी जागतिक पशूवैद्यकीय दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी 29 एप्रिलला जागतिक पशूवैद्यकीय दिन साजरा करण्यात येणार आहे.
काय आहे जागतिक पशूवैद्यकीय दिनाचा इतिहास : इंग्लंडमधील प्रा जॉन गमजी यांनी जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे युरोपमधील पशूवैद्यकांची 14 ते 18 जुलै 1863 या दरम्यान बैठक बोलावली होती. प्रा गमजी यांनी बोलावलेल्या या बैठकीत जागतिक पशूवैद्यकीय कॉग्रेसची स्थापना करण्यात आली. या पशूवैद्यकीय काँग्रेसचे पुढे जागतिक पशूवैद्यकीय संघटनेमध्ये रुपांतर करण्यात आले. त्यामुळे ही संघटना 90 राष्ट्रीय आणि 12 जागतिक पशू संघटनेचे नेतृत्व करते. या संघटनेच्या वतीने पशूवैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या पशूवैद्यकांना विशेष गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करते.
काय आहे पशूवैद्यकीय दिनाची थीम : जागतिक पशूवैद्यकीय संघटनेच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्यातील शेवटच्या शनिवारी जागतिक पशूवैद्यकीय दिन साजरा करण्याची घोषणा 2000 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पशूवैद्यकीय दिन साजरा करण्यात येतो. मानवी आरोग्याबाबत जागरूकता आल्यानंतर प्राण्यांच्या आरोग्याबाबतही जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्राण्यांपासून मानवात काही आजारांचा प्रसार होत असल्याने प्राण्याची काळजी घेणे गरजेचे होते. त्यामुळे प्राण्यांचे आरोग्य, देखभाल, त्यांचा आहार आदींची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. यासाठी जागतिक पशूवैद्यकीय संघटनेने दरवर्षी एक थीम घेऊन त्यावर काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जागतिक पशूवैद्यक संघटनेने 2022 या वर्षी हेल्थ फोर अनिमल असी थीम घेऊन कार्य केले होते. तर जागतिक पशूवैद्यक संघटनेने 2023 या वर्षासाठी पर्यावरण आरोग्याचा आवश्यक घटक ही थीम घेऊन कार्य करण्यात येते आहे.
हेही वाचा - World Malaria Day 2023 : दर दोन मिनिटाला मलेरियाने होतो एक मृत्यू, जाणून घ्या जागतिक मलेरिया दिनाचा इतिहास