ETV Bharat / sukhibhava

World Telecommunication Day 2023: एक असे घर जिथे आजही 135 वर्ष जुन्या टेलिफोनवर वाजते ट्रिंग ट्रिंग . . . . - टेलिफोन कंपनी

आज जागतिक दूरसंचार दिन (World Telecommunication Day 2023) जगभरात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे ईटीव्ही भारत तुम्हाला 135 वर्षे जुन्या टेलिफोनची माहिती देणार आहोत. या टेलिफोनची खासियत पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात.

World Telecommunication Day 2023
135 वर्ष जुना टेलिफोन
author img

By

Published : May 17, 2023, 8:39 AM IST

पाटणा : सध्या मोबाईलमध्ये 5 जी 6 जी सुविधा आल्या आहेत. मात्र एक काळ असा होता, तेव्हा कोणी टेलिफोन घेतला, तरी सगळ्या गावभर चर्चा व्हायची. आता अँड्रॉइडच्या जमान्यात मोबाईलमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. पण फोनची ट्रिंग ट्रिंग रिंग वाजली की नागरिक सावध व्हायचे. विशेषत: लहान मुलांमध्ये फोन कोण घेणार यावरुन स्पर्धा लागून भांडणे व्हायची ? खरे तर जुन्या काळातील या गोष्टींचा विचार करणे कल्पनारम्य वाटत असले तरी दूरसंचाराचे युग बदलायला फारसा वेळ लागला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे टेलिफोन हे नागरिकांच्या जगण्यातील अविभाज्य अंग झाले होते. जागतिक दूरसंचार दिनानिमित्त (World Telecommunication Day 2023) जाणून घेऊया भारतीयांसाठी काय होते टेलिफोनचे महत्व आणि त्याच्या इतिहासाबाबतची माहिती.

एरिक्सन कंपनीने बनवलेला स्टँड असलेला मेड इन यूएसए फोन आजही आमच्या घरी चांगल्या स्थितीत कार्यरत आहे. फोन चांगला चालतो पण त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. उद्या त्याचा काही भाग खराब झाला तर तो कुठे सापडेल? - अभिषेक पॅट्रिक, अ‍ॅम्ब्रोस पॅट्रिक यांचा मुलगा

World Telecommunication Day 2023
जुना टेलिफोन

कधी आला भारतात पहिला टेलिफोन : ग्रॅहम बेलने 2 जून 1875 रोजी जेव्हा टेलिफोनचा शोध लावला, तेव्हा संपूर्ण जग एका वायरद्वारे जोडले गेले होते. टेलिफोन नावाचे उपकरण सापडले त्यामुळे कोणी कितीही दूर बसले, तरी त्याच्याशी बोलणे शक्य झाले. टेलिफोनचा शोध लागल्यानंतर काही वर्षांनीच आपल्या देशात टेलिफोन आला. १८८१ मध्ये भारतात पहिल्यांदा टेलिफोन आला. मग ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. इंग्लंडमध्ये ही स्थापना झाल्यानंतर देशात कोलकाता, नंतर बॉम्बे आणि मद्रास तसेच अहमदाबादमध्ये टेलिफोन एक्सचेंज बांधण्यात आले. 28 जानेवारी 1882 रोजी प्रथमच औपचारिक टेलिफोन सेवा सुरू झाली. तेव्हा भारतात टेलिफोन सेवेचे ९३ ग्राहक होते.

135 वर्ष जुन्या टेलिफोनवर वाजते ट्रिंग ट्रिंग

पाटणामध्ये आहे 135 वर्षे जुना टेलिफोन : बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी अभिषेक पॅट्रिकचे वडील अ‍ॅम्ब्रोस पॅट्रिक यांच्या घरात टेलिफोनच्या सोनेरी भूतकाळाची प्रतिकृती आजही भव्य पद्धतीने जपली गेली आहे. 5G च्या या युगात अ‍ॅम्ब्रोस पॅट्रिकच्या घरात प्राचीन काळातील टेलिफोनची बेल अजूनही वाजते. त्यांच्याकडे 1888 मध्ये यूएसएमध्ये USA बनवलेला खास पितळेचा स्टँड टेलिफोन आहे. दुसरीकडे भारत सरकारने 1967-68 मध्ये बनवलेला डायल टेलिफोन आहे, जो आजही चांगला चालतो. अ‍ॅम्ब्रोस पॅट्रिक यांचा मुलगा अभिषेक पॅट्रिक याने मेड इन यूएसए टेलिफोन आजच्या युगात मिळणे फार कठीण आहे. म्हणूनच आम्ही तो फोन जपून ठेवला आहे. आता भविष्यात तो फोन क्वचितच उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

World Telecommunication Day 2023
जुना टेलिफोन

भारत सरकारने बनवलेला डायल टेलिफोन : हाजी गंज येथील अ‍ॅम्ब्रोस पॅट्रिक यांच्या घरात स्टँड टेलिफोनसह आणखी चार डायल टेलिफोन आहेत, जे चांगले काम करतात. आज जरी संपूर्ण जग मोबाईलमध्ये कैद झाले आहे. पण या फोनशी असलेली माझी भावनिक जोड कधीच संपणार नाही. त्याच्या घरी टेलिफोन कधी बसवला? याबाबत त्यांना नीट आठवतही नाही. कळत असल्यापासून घरात टेलिफोन लावला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

World Telecommunication Day 2023
जुना टेलिफोन

काय आहे बिहारमधील मोबाईलची टेलीडेन्सिटी : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायच्या अहवालात बिहारमध्ये मोबाईल मालकांची संख्या हळूहळू वाढत आहे. तर दुसरीकडे टेलिफोन मालकांची संख्या कमी होत आहे. ट्रायच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार बिहारमध्ये टेलिडेन्सिटी सातत्याने वाढत आहे. राज्यात जवळपास 55 टक्के नागरिकांकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील टेलिडेन्सिटी सातत्याने वाढत आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी बिहारची दूरध्वनी घनता 52.80 टक्के होती, ती 31 डिसेंबर 2021 रोजी वाढून 53.71 टक्के झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

World Telecommunication Day 2023
जुना टेलिफोन

हेही वाचा -

  1. Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: आज छत्रपती संभाजी महाराज जयंती, जाणून घेवू या त्यांच्या कार्याविषयी
  2. World Nurses Day 2023 : जागतिक परिचारिका दिन; यांच्या सेवेने खुलते रूग्णांचे आयुष्य...
  3. International Day Of Families 2023 : आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन का होतो साजरा? जाणून घ्या काय आहे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.