ETV Bharat / sukhibhava

World Sleep Day 2023 : शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप आहे महत्त्वाची

author img

By

Published : Mar 16, 2023, 6:55 PM IST

Updated : Mar 17, 2023, 6:57 AM IST

चांगले मन आणि निरोगी शरीरासाठी झोप घेणे महत्वाचे असते. त्यामुळे व्यक्तीने आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी चांगली झोप घ्यावी यासाठी जागतिक पातळीवर जागतिक निद्रा दिन साजरा करण्यात येतो.

World Sleep Day 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : खराब झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे चांगली झोप केवळ आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीच आवश्यक नाही तर मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यातही ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या जगभरातील नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत 17 मार्चला जगभरात जागतिक निद्रा दिन 2023 साजरा करण्यात येतो. नागरिकांना चांगल्या झोपेची आवश्यकता असल्याबाबतची जनजागृती या दिवशी करण्यात येते. जगभरातील लोकांना चांगली झोप घेण्याची जाणीव करून देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्त्वाची : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. परंतु बहुतेक लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे योग्य प्रमाणात आणि चांगल्या दर्जाची झोप घेता येत नाही. खराब जीवनशैलीसोबतच जगभरातील आजार आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमुख कारण खराब झोप असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. चांगल्या झोपेच्या गरजेबद्दल नागरिकांना जागृत करणे त्यासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या दर्जाची झोप घेण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक झोप दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 17 मार्च रोजी साजरा केला जात आहे.

काय आहे जागतिक निद्रा दिनाची थीम : वर्ल्ड स्लीप सोसायटीने आयोजित केलेल्या दिनानिमित्त दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे या थीमवर साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे झोप हा आपल्या जीवनाचा एक अतिशय सामान्य भाग आहे. मात्र झोपेला बहुतेक नागरिक फारसे गांभीर्याने घेत नाहीत. परंतु कमी झोपेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होतात. मात्र आपल्या जीवनावर आणि दिनचर्येवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

सोशल मीडियावर सुरू आहे प्रचार : जागतिक निद्रा दिनानिमित्त जागतिक निद्रा सोसायटीचे सदस्यच नाही, तर ७० हून अधिक देशांतील अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्था प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षी या कार्यक्रमात सर्वसामान्यांना सहभागी करण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटी सोशल मीडियावर #WorldSleepDay या हॅशटॅगसह चांगल्या आणि वाईट झोपेचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा प्रचार करत आहेत.

जागतिक निद्रा दिवसाचा इतिहास : झोपेच्या गंभीर समस्या असलेल्या लोकांना मदत करण्याच्या जनजागृती करण्यात येते. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड स्लीप सोसायटीच्या कमिटीने 2008 मध्ये वर्ल्ड स्लीप डे सुरू केला होता. या समितीमध्ये आरोग्य, व्यावसायिक आणि झोपेचे औषध आणि झोपेच्या संशोधनाच्या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश होता. वर्ल्ड स्लीप डे दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम 17 मार्च रोजी आयोजित केला जात आहे. विशेष म्हणजे जागतिक निद्रा दिनानिमित्त ७० हून अधिक देशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये झोप, झोपेचे औषध, झोपेबद्दलचे शिक्षण आणि झोपेच्या कमतरतेचे दैनंदिन जीवनावर होणारे सामाजिक परिणाम आणि एकूणच आरोग्यावर कमी झोपेचे सौम्य ते गंभीर परिणाम या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

झोपेचे आरोग्य कसे सुधारावे : मेंदू आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक असल्याचे मत मानसशास्त्रज्ञ व्यक्त करतात. त्यासाठी काही सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. तर काही सवयी अंगीकारल्याने झोपेचा दर्जा सुधारण्यास खूप मदत होते.

वेळेवर झोपा वेळेवर उठा :

  • झोपण्याच्या वेळेचे योग्य नियम पाळणे जसे की झोपण्याच्या खोलीचे वातावरण बरोबर ठेवणे, टीव्ही आणि मोबाईल जास्त वेळ पाहणे टाळणे आदी
  • योग्य वेळी योग्य अन्न खाणे
  • नियमित व्यायाम आणि ध्यान
  • तणावापासून दूर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा
  • विश्रांतीसह करा कार्य
  • कॉफीचे सेवन कमी करा
  • स्लीप एपनिया आणि निद्रानाश यांसारखे विकार असतील तर त्यावर योग्य उपचार घेणे इ.

हेही वाचा - Covid Impact On Teens Mental Health : कोरोनाचा बालकांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम ; लॅन्सेटचा दावा

Last Updated : Mar 17, 2023, 6:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.