ETV Bharat / sukhibhava

World Samosa Day 2023 : जागतिक समोसा दिवस 2023; जाणून घ्या भारतात कधी आणि कुठून आला समोसा...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 12:35 PM IST

10 व्या शतकाच्या आसपास मध्य आशियातून आलेला, समोसा आता भारतातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्सपैकी एक आहे. आपल्या देशात समोशाशिवाय जीवन अपूर्ण आहे इतका तो लोकप्रिय झाला आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे आता दरवर्षी 05 सप्टेंबर रोजी जागतिक समोसा दिन साजरा केला जातो.

World Samosa Day 2023
जागतिक समोसा दिवस

हैदराबाद : समोसा हे असं स्नॅक्स आहे ज्याचं नाव ऐकताच लहान मुलं, तरुण, वृद्ध सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. देशातच नाही तर परदेशातही लोक अगदी चवीने समोसा खातात. लोकांना समोसे इतके आवडतात की आता तो 'कॉन्टिनेंटल स्नॅक' बनला आहे. ही लोकप्रियता लक्षात घेऊन दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'जागतिक समोसा दिन' साजरा केला जातो. समोशाची चव आवडत नाही, असा खवय्या विरळाच. हा समोसा भारतात आला कुठून आणि कधी आला याचा विचार तुम्ही केला आहे का? समोसा हा पर्शियन शब्द 'संमोक्सा' पासून आला आहे. समोसा 10 व्या शतकापूर्वी मध्य पूर्व मध्ये चर्चेत आला आणि 13 व्या आणि 14 व्या शतकात भारतात आला.

इराणमधून भारतात आला समोसा : समोसा भारतात विदेशी व्यापाऱ्यांकडून आला. तेव्हापासून त्याची चव प्रत्येकाच्या जिभेवर रुळली आणि आज तो एक मनपसंत नाश्ता बनला आहे. मैदा, बटाटे आणि मसाल्यापासून समोसा तयार केला जातो. समोशाबद्दलच्या अनेक कथा आजही खूप प्रसिद्ध आहेत. काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की, समोसा मूळचा इराणचा. तिथून तो भारतात आला. दुसरीकडे याविषयी असंही म्हटलं जातं की, दहाव्या शतकात महमूद गझनवीच्या दरबारात एक शाही पेस्ट्री सादर केली गेली होती, ज्यामध्ये मांस भरलेले होते. दिसायला अगदी समोशासारखाच होता. त्यामुळे येथूनच समोशांचा परिचय झाला.

काय आहे याचं महत्त्व : समोसा हा अनेकांना प्रिय नाश्ता म्हणून 'जागतिक समोसा दिवस' साजरा केला जातो. 'जागतिक समोसा दिन' साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. या दिवशी आपण समोसे जास्तीत जास्त खाऊ शकतो. पनीर समोसे ते चिकन समोसे आणि कांद्याचे समोसे, असे अनेक प्रकार खाऊ शकता. हा दिवस साजरा करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे 'समोसा पार्टी' आयोजित करणं आणि सर्व मित्र आणि नातेवाईकांना स्मरणीय संध्याकाळ साजरी करण्यासाठी आमंत्रित करणं.

बटाटा समोसा कसा बनवायचा : 16 व्या शतकाच्या आसपास पोर्तुगीजांनी भारतात बटाटे आणले होते. त्यानंतर येथे त्यांची लागवड सुरू झाली. बटाट्याची लागवड सुरू झाल्यावर बटाटे, हिरवी धणे, मिरची आणि मसाले एकत्र करून मसाला तयार केला जायचा आणि मग तो समोशामध्ये भरायचा. यानंतर, जेव्हा ते बनवलं गेलं तेव्हा सर्वांना त्याची चव खूप आवडली आणि पुढे पुढे प्रसिद्धी वाढली. आजही ही किमया कायम आहे. बटाट्याचा समोसा भारतातच नाही तर परदेशातही अनेकांना खूप आवडतो. इजिप्तपासून झांझिबारपर्यंत आणि मध्य आशियापासून चीनपर्यंत जगभरात उपलब्ध असलेल्या समोश्यांच्या प्रकारांमध्ये भारतीय बटाटा समोसा सर्वोत्तम आहे.

हेही वाचा :

  1. Clove Health Benefits : छोट्याशा लवंगीचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या....
  2. Coconut for hair : फक्त तेलच नाही तर नारळपाणी देखील बनवते केसांना निरोगी; वाचा कसं वापरायचं ते...
  3. Dragon Fruit Benefits : अनेक आजारांपासून वाचवते ड्रॅगन फ्रूट; जाणून घ्या काय आहेत फायदे...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.