ETV Bharat / sukhibhava

जागतिक अवयव दान दिन २०२० - अवयव दानासंबंधी माहिती

मानवतेसाठी अवयव दानासारखे कार्य नाही. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला या अवयवांचा काही उपयोग नाही. पण त्याच अवयवामुळे इतर कुणाचे नवे आयुष्य उमलू शकते. अवयवदानाबद्दल अनेक भ्रम आणि अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धा नाहीशा करायला आणि लोकांमध्ये अवयव दानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी १३ ऑगस्टला जागतिक अवयव दान दिवस साजरा केला जातो.

world organ donation day
जागतिक अवयव दिन २०२०
author img

By

Published : Aug 14, 2020, 10:55 AM IST

हैदराबाद - जी व्यक्ती अवयव दान करते, ती ८ लोकांचे जीव वाचवते आणि पेशींचा भाग दान केला तर ५० लोकांचे आयुष्य सुधारू शकते. मानवतेसाठी अवयव दानासारखे कार्य नाही. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला या अवयवांचा काही उपयोग नाही. पण त्याच अवयवामुळे इतर कुणाचे नवे आयुष्य उमलू शकते. अवयवदानाबद्दल अनेक भ्रम आणि अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धा नाहीशा करायला आणि लोकांमध्ये अवयव दानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी १३ ऑगस्टला जागतिक अवयव दान दिवस साजरा केला जातो. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी अवयव उपलब्धतेच्या अभावी ५ लाख लोकांचा मृत्यू होतो.

म्हणून भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टलमध्ये काही तथ्य सांगितली आहेत. अवयव दानासंबंधी ही माहिती तुम्हाला हवी.

  • अवयव दानासाठी वय, जात, धर्म, जमात इत्यादीचा अडसर नाही. अवयव दान कुणीही करू शकते.
  • अवयव दानासाठीचे असे वय नाही. अवयव दानाचा निर्णय वैद्यकीय स्थिती पाहून घेतला जातो. वय पाहून नाही.
  • १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या दात्याच्या पालकाने करार करावा लागेल.
  • कर्करोग, एचआयव्ही, मधुमेह, किडनीचे आजार किंवा हृदय रोग असेल तर हे अवयव दान करता येणार नाही.

काय दान करता येते ?

नैसर्गिक मृत्यू असेल तर

  • कार्नियासारखे टिश्यू
  • हृदयाचे वाॅल्व
  • त्वचा
  • हाडे

ब्रेन डेथ झाल्यास -

  • हृदय
  • यकृत
  • किडनी
  • आतडे
  • फुफ्फुसे
  • स्वादुपिंड

यशस्वी प्रत्यारोपण क्रियेनंतर हात आणि चेहरा यांचाही अवयव दानात समावेश केला आहे. बऱ्याचदा मृत व्यक्तींचे अवयव दान केले जाते. पण जिवंतपणीही काही अवयवांचे दान करता येते. जिवंतपणी पुढील अवयव दान करू शकता –

  • एक किडणी
  • एक फुफ्फुस
  • यकृताचा एक भाग
  • स्वादुपिंडाचा एक भाग
  • आतड्याचा एक भाग

काही सर्वसाधारण भ्रामक समजुती

  1. तुम्ही आजारी असाल तरच अवयव दान करू शकता. कोणीही दाता म्हणून नाव नोंदणी करू शकते. वय आणि वैद्यकीय स्थितीची गरज नाही. मृत्यूसमयी वैद्यकीय टीम अवयव दानाचा निर्णय घेईल. पण तरीही तुम्ही अवयव दान किंवा टिश्यू दान करू शकता.
  2. दात्याच्या कुटुंबाला पैसे द्यावे लागतात- अजिबात नाही. दात्याच्या कुटुंबाला पैसे द्यावे लागत नाही.
  3. मी अवयव दान करण्यासाठी लहान आहे - कुठल्याही वयात तुम्ही अवयव दान करू शकता. फक्त एखादी व्यक्ती १८ वर्षाखाली असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक करार करू शकतात.
  4. डॉक्टर मला वाचवायचे प्रयत्न करणार नाहीत - कुठल्याही किमतीवर रुग्णाला वाचवणे हे डॉक्टरांचे प्राधान्य असते. ब्रेन डेड झाला असेल तरच व्यक्तीच्या अवयव दानाचा निर्णय होतो. शिवाय वैद्यकीय टीम आणि प्रत्यारोपण टीम हे दोन वेगवेगळे भाग आहेत.
  5. माझे खूप वय झाले आहे, मी अशक्त आहे, माझी प्रकृती चांगली नाही, कोणाला माझे अवयव नकोत. - आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही वयात अवयव दान करता येते. नंतर तज्ज्ञ निर्णय घेतात की तुमचे अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत की नाहीत. तुम्ही स्वत:ला अपात्र ठरवू नका.

म्हणूनच, एखाद्याला अवयव दान करणे आणि नव्या आयुष्याची भेट देणे ही तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली गोष्ट आहे. तुमच्या शरीराचा नाश न करता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडते. लोक घाबरवतच असतात. पण त्याकडे लक्ष न देता उदात्त गोष्ट करण्यापासून तुम्ही वंचित राहू नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.