ETV Bharat / sukhibhava

World Mental Health Day 2023 : जगभरात एक अब्ज नागरिक मानसिक आजाराचे बळी; जाणून घ्या, मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना - WFMH

World Mental Health Day 2023 : मानसिक आजाराचे रुग्ण वाढल्यानं जागतिक पातळीवर मोठी चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ' जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करते. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ'च्या वतीनं 10 ऑक्टोबर हा 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

World Mental Health Day 2023
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 8:22 AM IST

हैदराबाद World Mental Health Day 2023 : व्यक्तीचं मानसिक आरोग्य स्वस्थ असलं, तर व्यक्तीचं आयुष्य सुंदर होते. मात्र जगभरातील एक अब्ज नागरिक मानसिक आजाराला बळी पडले आहेत. सध्याच्या घडीला या संख्येत भरच पडत आहे. त्यामुळे मानसिक आजारानं ग्रस्त असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. याबाबत जागतिक पातळीवर मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक आरोग्याची गरज, मानसिक आरोग्याची हानी, मानसिक आरोग्य ढासळलेल्या व्यक्तीला उपचारांची जागरुकता, यासाठी 10 ऑक्टोबरला जगभरात 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया मानसिक आरोग्य दिनाची थीम आणि इतिहास याबाबतची सविस्तर माहिती.

  • As we mark our 75th Anniversary coinciding with World Mental Health Day 2023, the World Federation for Mental Health (WFMH) is proud to unveil a special bulletin!

    Visit the link below to read the full bulletin -https://t.co/tY4g7bk0VT pic.twitter.com/wRyHUPlZJI

    — World Federation for Mental Health (@WFMH_Official) September 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम : जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरला जगभरात साजरा करण्यात येतो. 'जागतिक मानसिक आरोग्य दिन 2023' ला 'मानसिक आरोग्य हा मानवी हक्क आहे' ही थीम निवडण्यात आली आहे. जागतिक स्तरावर या थीमची निवड मतदानानं निश्चित करण्यात आली. त्यासह वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) सदस्य, जागतिक पातळीवर मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि इतर सामाजिक संस्थाचं मत ही थीम निवडताना विचारात घेतलं आहे.

काय आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास : 'वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ'च्या वतीनं 10 ऑक्टोबर 1942 ला पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जगभरात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. चर्चासत्रं, जनजागृती रॅली यामधून मानसिक आरोग्याचं महत्व पटवून दिलं जाते.

मानसिक आजारानं त्रस्त नागरिकांच्या वाढल्या आत्महत्या : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं (NCRB) जारी केलेल्या क्राईम इन इंडिया 2021 च्या अहवालानुसार 1 लाख 64 हजार 033 इतक्या मानसिक आजारानं त्रस्त असलेल्या नागरिकांनी भारतात आत्महत्या केली आहे. ही आकडेवारी 18.6 टक्के इतकी आहे. 2020 च्या आकडेवारीच्या तुलनेत या संख्येत 6.2 टक्केनं वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये हा आकडा 9.9 टक्के इतका होता. तर 2018 मध्ये 10.2 टक्के नागरिक मानसिक आरोग्याचे बळी पडले होते. मात्र 2021 मध्ये मानसिक आजाराला बळी पडलेल्या नागरिकांनी आत्महत्या केल्याचा आकडा 12 टक्क्यांवर पोहोचला.

आज वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थचा 75 वा वर्धापन दिन : जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) आपलं धोरण आखते. त्यामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्य संतुलित कसं राखता येईल, याचा विचार करुन ही धोरणं आखली जातात. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) ची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली होती. यावर्षी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. World Heart Day २०२३ : जागतिक हृदय दिन 2023; हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या एका तासाला का म्हणतात 'गोल्डन अवर'
  2. World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिवस 2023; 'हे' शाहकारी पदार्थ आहेत प्रथिनांचं भांडार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.