ETV Bharat / sukhibhava

World Health Day 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो जागतिक आरोग्य दिन, काय आहे इतिहास - आरोग्य दिनाचा इतिहास

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी सगळ्यांसाठी आरोग्य ( Health For All ) ही जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे.

World Health Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 6, 2023, 4:18 PM IST

Updated : Apr 7, 2023, 6:28 AM IST

हैदराबाद : आरोग्य ही नागरिकांची खरी संपत्ती असल्यामुळे आरोग्याची निगा राखणे गरजेचे आहे. मात्र सध्या नागरिक आरोग्याच्या बाबतीत प्रचंड निष्काळजीपणा करतात. निष्काळजीपणामुळे जगभरातील नागरिकांना विविध आजाराने आपला जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे आरोग्यदिनी आपल्या आरोग्याची कशी निगा राखावी, याबाबतची माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

काय आहे आरोग्य दिनाचा इतिहास : जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 ला करण्यात आल्यामुळे याच दिवशी आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जिनीव्हा येथे 1948 ला प्रथमच आरोग्य सभा भरवण्यात आली होती. त्या सभेत जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केल्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतात.

काय असते जागतिक आरोग्य दिनाची थीम : जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी आरोग्य दिनाची थीम जाहीर करण्यात येते. 1995 ला साजरा करण्यात आलेल्या आरोग्य दिनाची पोलिओ ही थीम घेण्यात आली होती. त्यामुळे पोलिओ हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रयत्न केल्याने पोलिओ जगातून नाहीसा झाल्याचे दिसून येते. आरोग्याच्या बाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक वर्षी एक विशेष थीम घेऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्या थीमवर जगभरात काम करण्यात येते. यावर्षी संघटनेच्या वतीने सर्वांसाठी आरोग्य ( Health For All ) ही थीम गोषित केली आहे. त्यामुळे जगभरात आरोग्याच्या विविध प्रश्नांबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

काय आहे आरोग्य दिनाचे महत्व : सध्या नागरिकांचा फास्टफूड खाण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होता. त्यासह पीकवण्यात येणारे अन्नपदार्थ हायब्रिड असल्याने त्यामुळे असंख्य रसायने मानवाच्या शरीरात जातात. ही रसायने मानवी आरोग्यावर विपरित परिणाम करतात. त्यामुळे नागरिकांना वारंवार प्रकृती बिघडण्याचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी मानवाला आरोग्याच्या बाबत जागृत करण्याची गरज आहे. शरीर हीच खरी मानवाची संपत्ती आहे. त्यामुळे शरीराची निगा राखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन महत्वाची भूमिका बजावतो.

हेही वाचा - Covid Accelerates Dementia : कोरोनामुळे स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना बसला फटका; आजारात दिसून आली वाढ

Last Updated : Apr 7, 2023, 6:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.