ETV Bharat / sukhibhava

World Day Of The Deaf : जागतिक कर्णबधिर दिन 2023; जाणून घ्या या दिनाचा उद्देश आणि थीम - ऐकू न येणं

World Day Of The Deaf : बहिरेपणाबद्दल जागरुकता वाढवणं, श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रकार आणि कारणं याबद्दल जागरुकता निर्माण करणं आणि बधिरांसाठी सांकेतिक भाषा आणि इतर साधनांबद्दल माहिती पसरवणं या उद्देशानं दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कर्णबधिर दिन आयोजित केला जातो.

World Day Of The Deaf
जागतिक मूकबधिर दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 12:56 PM IST

हैदराबाद : World Day Of The Deaf दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफच्या म्हणण्यानुसार, सध्या जगभरात 70 दशलक्षाहून अधिक लोक बहिरेपणा किंवा ऐकू न येण्यानं त्रस्त आहेत. त्यापैकी 80% पेक्षा जास्त विकसनशील देशांतील आहेत. बहिरेपणा किंवा ऐकू न येणं ही विविध कारणांमुळं असू शकतं परंतु एकदा पीडित व्यक्तीला या समस्येचा त्रास झाला की त्याला/तिला इतरांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं की कामाच्या ठिकाणी किंवा समाजात इतर लोकांमध्ये मिसळण्यात समस्या. कधी-कधी कर्णबधिर व्यक्तींना समाजातच नव्हे तर नातेवाईक किंवा कुटुंबीयांकडूनही उपेक्षेचा सामना करावा लागतो.

जागतिक कर्णबधिर दिनाचे उद्दिष्ट : बहिरेपणाची कारणं समजून घेणं आणि त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी उपाययोजना करणं तसेच कर्णबधिरांना समाजात आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणं आणि त्यांना सामान्य जीवन जगण्याच्या संधी निर्माण करणं देखील खूप महत्वाचं आहे. यासाठी दरवर्षी 24 सप्टेंबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह" म्हणून साजरा केला जातो आणि सप्टेंबरचा शेवटचा रविवार "जागतिक कर्णबधिर दिन" म्हणून पाळला जातो. यावर्षी 2023 चा जागतिक कर्णबधिर दिन 24 सप्टेंबर रोजी “सर्वांसाठी कान आणि श्रवण काळजी” या थीमसह साजरा केला जात आहे. बहिरेपणा किंवा श्रवणदोष हा एक प्रकारचा अपंगत्व मानला जातो. या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांना इतरांचं पूर्णपणे ऐकणं कठीण वाटतं. परंतु याचा अर्थ असा नाही की ते इतरांशी संवाद साधू शकत नाहीत. बहिरेपणाचा त्रास असलेले लोक सांकेतिक भाषा शिकून आणि काही विशेष प्रशिक्षणाच्या मदतीनं इतर लोकांशी संवाद साधू शकतात किंवा त्यांचे विचार शेअर करू शकतात. मात्र यासाठी केवळ बहिरेपणाचा सामना करणाऱ्या लोकांनाच नाही तर त्यांच्याशी संबंधित लोक, त्यांचे मित्र आणि इतरांनीही या दिशेनं प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कर्णबधिरांनाही सामान्य जीवन जगता येईल.

जागतिक कर्णबधिर दिनाचा इतिहास : जागतिक कर्णबधिर दिनाची सुरुवात रोम, इटली येथे 1958 मध्ये जागतिक कर्णबधिर महासंघाने केली. खरं तर, हा कार्यक्रम फेडरेशनने 1951 मध्ये झालेल्या पहिल्या जागतिक परिषदेच्या स्मरणार्थ आयोजित केला होता. नंतर 1959 मध्ये जागतिक मुकबधिर संघटनेला संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा जागतिक कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर, बहिरेपणाची कारणे, उपचार आणि व्यवस्थापन याबाबत सर्वसामान्यांना प्रबोधन करणे आणि त्यापासून त्रस्त असलेल्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे या उद्देशाने सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कर्णबधिरांना इतरांशी संवाद साधणे सोपे व्हावे या उद्देशाने 2018 मधील इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ दरम्यान आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषेलाही मान्यता देण्यात आली. त्यानंतर हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा :

  1. Benefits of Roasted chana : फुटाणे आहेत अनेक समस्येवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
  2. Benefits Of Makhana : मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
  3. Dengue Outbreak In Bihar : बिहारमध्ये डेंग्यूचं थैमान, डेंग्यूच्या नवीन रुग्णांची संख्या 300 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.