ETV Bharat / sukhibhava

World Birth Defects Day 2023 : जगभरात दरवर्षी 8 दशलक्ष नवजात बाळांना होतो जन्मदोष, अशी घ्या काळजी

नवजात बालकांना जन्मदोष असल्याने जगभरातील बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ३ मार्च हा जागतिक जन्मदोष दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी जागतिक आरोग्य संघटना जन्मदोषांच्या आजाराबाबत पालकांमध्ये जनजागृती करत आहे.

World Birth Defects Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2023, 12:42 PM IST

हैदराबाद : जगभरातील नवजात बाळांना जन्मदोष होत असल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. त्यामुळे जन्मदोष असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ३ मार्च हा जागतिक जन्मदोष दिन म्हणून साजरा करण्यात येतात. जन्मदोष असलेल्या मुलांमध्ये मृत्यूचे आणि आजीवन अपंगत्वाचे प्रमाण प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

१.७ दशलक्ष बालकांना जन्मदोष : जगभरात दरवर्षी 8 दशलक्ष नवजात बालके जन्मजात दोषासह जन्माला येतात. त्याचवेळी भारतात 1.7 दशलक्षांपेक्षा जास्त आकडा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जन्मस्थान, वंश आणि जन्मजात दोष बाळांच्या आरोग्यावर विपरित प्रभाव करत असल्याचे सीडीसी ( CDC ) च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील नवजात आणि लहान मुलांच्या मृत्यूचे जन्मदोष हे प्रमुख कारण मानले जाते. ही चिंतेची बाब असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. मुले जन्मदोषातून सावरली तरी त्यातील अनेकांना आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यासाठी दरवर्षी ३ मार्च हा जागतिक जन्मदोष दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे जन्मजात विसंगतीचा प्रकार : मूल जेव्हा काही दोष, विकृती, विकार किंवा रोग घेऊन जन्माला येते, तेव्हा त्या स्थितीला जन्मजात विसंगती म्हणतात. सामान्यपणे नोंदवलेल्या जन्मजात विसंगतींमध्ये फाटलेले ओठ किंवा टाळू, डाऊन सिंड्रोम, जन्मजात बहिरेपणा, ट्रायसोमी 18, क्लबफूट, हृदय दोष, न्यूरल ट्यूब दोष, सिकल सेल अॅनिमिया आणि सिस्टिक फायब्रोसिस आणि क्रोमोसोमल विकृती यांचा समावेश होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. जन्मजात विसंगती अनुवांशिक समस्या, गरोदर मातेमध्ये किंवा गर्भाशयात असलेल्या मुलामध्ये काही प्रकारचा संसर्ग किंवा पोषणाचा अभाव आदी प्रकारामुळे होऊ शकतो असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बालमृत्यूंचे प्रमाण वाढले : दक्षिण-पूर्व आशियात जन्म दोष हे बालमृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर बालमृत्यू हे बालकांच्या मृत्यूचे चौथे सर्वात मोठे कारण असून त्याची आकडेवारी तब्बल 12 टक्के आहे. 2010 ते 2019 दरम्यान दक्षिण-पूर्व आशियात जन्मदोष आणि बालमृत्यूचे प्रमाण 6.2 टक्क्यावरून 9.2 टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल यांनी दिली आहे. 2019 मध्ये जन्म दोषांमुळे 1 लाख 17 हजार मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जन्मदोषांना आळा घालण्यासाठी : जागतिक जन्म दोष दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटना राष्ट्रीय स्तरावर जन्मदोषांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी शोध, व्यवस्थापन आणि काळजी यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशीक संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंह यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर जारी केली आहे. सन 2014 पासून सर्वच देशांमध्ये माता, नवजात बालक आणि बालमृत्यू झपाट्याने कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जन्मदोषांचे प्रतिबंध, शोध, व्यवस्थापन आणि काळजी यासाठी सतत कार्य करत असल्याची माहितीही पूनम खेत्रपाल सिंह यांनी दिली. अनेक देशांमध्ये रुग्णालयांवर आधारित जन्मदोष निरीक्षण देखील जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले आहे. जन्मजात दोष टाळण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना देखील लागू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मुलाला दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्यासह सामाजात जगण्याचा अधिकार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्वच देशात जन्मदोष टाळण्यासाठी, शोधण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय घ्यावी सावधगिरी :

  • बालकांना जन्मदोष टाळण्यासाठी मातेने काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गरोदरपणात महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, कडधान्ये, फळे यांचा समावेश असलेला सकस आहार घ्यावा, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळू शकेल. गर्भवती महिलांनी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान हानिकारक पदार्थांपासून दूर राहावे. गर्भवती महिलांनी नियमित अंतराने त्यांच्या स्थितीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. गर्भधारणेच्या सुरुवातीपासून संपूर्ण कालावधीपर्यंत डॉक्टरांनी सांगितलेली खबरदारीचे पालन करण्यात यावे.

हेही वाचा - World Hearing Day 2023 : जगभरातील दीड अब्ज लोकांना ऐकू न येण्याची समस्या, तर भारतात २७ हजार नागरिकांना दरवर्षी होतो बहिरेपणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.