ETV Bharat / sukhibhava

World Autism Awareness Day 2023 : भारतात दरदिवशी 8 जण होतात ऑटिझमचे शिकार ; जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे - आजार

जगभरात 2 एप्रिलला ऑटिझम दिवस साजरा करण्यात येतो. भारतात दरदिवशी 8 नागरिकांना ऑटिझमने बळी पडावे लागते. त्यामुळे या दिवशी जनजागृती करण्यात येते.

World Autism Awareness Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 1, 2023, 3:11 PM IST

Updated : Apr 2, 2023, 6:44 AM IST

हैदराबाद : जगभरात ऑटिझमने ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत असून भारतात तब्बल 21 लाख 60 हजार ऑटिझमचे रुग्ण आहेत. मात्र ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबाबत अजूनही समाजात जागृती नाही. हा आजार अजूनही दुर्लक्षित आहे, असेच म्हणावे लागेल. मुलाचे सामाजिक वर्तन वयानुसार बदलले पाहिजे, परंतु न्यूरोलॉजिकल कारणामुळे तसे होत नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस दरवर्षी 2 एप्रिलला साजरा केला जातो. ऑटिझम या आजारामुळे मुलाच्या मेंदूचा योग्य विकास होऊ शकत नाही.

ऑटिझम म्हणजे काय : एक जटिल न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे ऑटिझम आजाराला संबोधले जाते. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही मुलांमधील न्यूरो डेव्हलपमेंटल विकृतींद्वारे आलेली स्थिती आहे. ऑटिझमला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हणतात. साधारणपणे हा आजार वयाच्या 3 वर्षापूर्वी प्रकट होत असून त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो. जन्माच्या वेळी हा आजार ओळखता येत नसून हळूहळू मुलांमध्ये या आजाराची लक्षणे पालकांना दिसून येतात. हा आजार सहसा पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनामुळे होते.

काय आहेत ऑटिझमची लक्षणे : मुलांना वावरताना अडचण येऊन चेहऱ्यावर कोणताही हावभाव नसतो. यामुळे बोलण्यात अडचण येते. त्यासह मुलांचा आवाजही असामान्य होतो. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. सामाजिक संवाद आणि सामान्य मानसिक वाढ या दरम्यान बुद्धिमत्ता विकसित होत नाही. त्यावरुन मुलांमध्ये ऑटिझम हा आजार बळावत असल्याचे दिसून येते.

कसे करावे उपचार : ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरवर कायमस्वरूपी उपाय नसल्याचे काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. मात्र एकच उपाय प्रत्येकाला कामी येईल असेही नसल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे कमी करणे आणि मुलाची कार्य करण्याची क्षमता सुधारणे हे उपचारांचे ध्येय असते. ऑटिझम उपचारांमध्ये औषधोपचार, वर्तणूक शिक्षण आणि सामाजिक संप्रेषण कौशल्ये सुधारणे, सकारात्मक वर्तणूक आणि कार्यप्रदर्शन सुधारणे यासारख्या मानसिक तंत्रांचा समावेश करण्यात येतो.

ऑटिझमने दरदिवशी 8 जण होतात शिकार : भारतात सद्या ऑटिझमचे 21 लाख 60 हजार रुग्ण असल्याचे विविध आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. दरवर्षी भारतात 11 हजार 914 रुग्ण ऑटिझमने बाधित होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर दर महिन्यात 250 एका आठवड्यात 57 तर दरदिवशी 8 जण ऑटिझमने शिकार होत असल्याचेही या आकडेवारीवरुन उघड झाले आहे.

हेही वाचा - Blindness Prevention Week 2023 : जगातील 2.2 अब्ज नागरिकांना आहे दृष्टीदोष ; जाणून घ्या काय आहे अंधत्व प्रतिबंध सप्ताह

Last Updated : Apr 2, 2023, 6:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.