हैदराबाद - लिपिड प्रोफाईल एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावते. लिपिड हे चरबी किंवा चरबीसारखे पदार्थ असतात जे आपल्या शरीरात योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. हैदराबाद येथील व्हीआयएनएन रुग्णालयातील डॉ. राजेश वुक्कला यांनी सांगितले की, लिपिड प्रोफाईल म्हणजे शरीरात असणारे फॅट. लिपिड प्रोफाईलला चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉल अशा दोन भागात विभागले जाते.
संपूर्ण कोलेस्टेरॉल - शरीरात असणारे कोलेस्टेरॉलची मात्रा म्हणजे संपूर्ण कोलेस्टेरॉल. एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात 200 mg/dL इतके कोलेस्टेरॉल असू शकते. तसेच मधुमेह, मूत्रपिंडासंबंधी आजार, उच्च रक्तदाब आदी आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये 150 mg/dL असू शकते.
उच्च घनतेचे लिपोप्रोटीन - हे एक चांगले कोलेस्टेरॉल आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडकलेले फॅट बाहेर काढले जाते. याचे प्रमाण 2.40-60 mg/dL पर्यंत असेल तरच चांगले आहे.
कमी घनतेचे लिपोप्रोटीन - हे अपायकारक कोलेस्टेरॉल आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होते. कमी घनतेच्या लिपोप्रोटीनचे प्रमाण जास्त असेल तर हृदहयरोगाचे शक्यता बळावते. निरोगी व्यक्तींसाठी 100 mg/dL, तर काही आजार असलेल्या व्यक्तींमध्ये 70 mg/dL इतके प्रमाण असणे गरजेचे आहे.
अत्यल्प घनतेचे लिपोप्रोटीन हा देखील एक अपायकारक कोलेस्टेरॉलचा प्रकार आहे. तसेच कोलेस्टेरॉल आणि जास्त घनतेचे कोलेस्टेरॉल गुणोत्तर काही अहवालांमध्ये दिलेले असते. यावरून कोलेस्टेरॉलची पातळी समजून येते.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे हे अपायककारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असण्यापेक्षा धोकादायक आहे. यामुळे त्या व्यक्तीला अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, असेही डॉ. राजेश यांनी सांगितले. त्यामुळे आपले कोलेस्टेरॉलचे प्रमाण नेहमी नियंत्रित ठेवावे.