ETV Bharat / sukhibhava

गरम पाण्यासाठी हीटर वापरताय? या धोक्यांपासून रहा सावध - गिझर आणि सोलर वॉटर हीटर्स

Water Heater Precautions : तुम्ही गरम पाण्यासाठी वॉटर हीटर वापरता का? वापरत असाल तर काय खबरदारी घ्यावी हे तुम्हाला माहीत आहे का? नाहीतर धोका पत्करावा लागेल! जाणून घ्या काय खबरदारी घ्यावी.

Water Heater Precautions
गरम पाण्यासाठी हीटर वापरताय?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 11:58 AM IST

Updated : Dec 5, 2023, 12:34 PM IST

हैदराबाद : हिवाळा आला की थंड पाण्याने तोंड धुतानाही नकोसं वाटतं. थंड पाण्याने आंघोळ तर त्यापेक्षा अवघड! म्हणूनच, अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. मात्र, पूर्वी लाकडाच्या चुलीवर पाणी गरम केलं जायचं. आता प्रत्येक स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह आल्यानं लाकडाची चूल गायब झाली आहे. पाणी गॅसवर गरम केलं तर गॅस लवकर रिकामा होईल, म्हणूनच बरेच लोक पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटर्स वापरतात. ज्यांना घरात गिझर आणि सोलर वॉटर हीटर्स बसवता येत नाहीत ते बहुतेक लोक वॉटर हीटर वापरतात. कमी किमतीत मिळत असल्याने त्यांची खरेदी केली जाते. मात्र, वॉटर हीटर वापरताना कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागते. या हीटर्सचा वापर करताना काही खबरदारी घेतल्यास अपघात घडण्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो.

हीटर वापरताना घ्यावयाची काळजी

  • वॉटर हीटर वापरताना खूप काळजी घ्या. प्लग योग्य आहेत का ते तपासा. अन्यथा शॉक लागण्याचा धोका असतो.
  • लहान मुले खेळतात अशा ठिकाणी हीटरने पाणी गरम करू नये. तुम्ही ते घरात कुठेही ठेवले तरी, तुम्ही ते बंद करेपर्यंत त्यावर लक्ष ठेवावे लागेल.
  • बाथरूममध्ये वॉटर हीटर्स ठेवू नयेत. तेथे सर्व काही ओले असल्याने शॉक लागण्याचा धोका असतो.
  • वॉटर हीटर रॉड्समध्ये ऑटो स्विचऑफ पर्याय नाही. म्हणून, हे चालू केल्यानंतर काही वेळाने बंद केले पाहिजे.
  • रॉड पूर्णपणे पाण्यात बुडल्यानंतर स्विच चालू करा.
  • बादलीतील पाणी गरम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पाण्यात बोट घालू नका. यामुळे शॉक बसू शकतो.
  • हीटर बंद करूनही पाण्याचे तापमान तपासू नका. पूर्णपणे अनप्लग केल्यानंतरच हाताने तापमान तपासा.
  • त्याचप्रमाणे.. स्विच ऑफ केल्यानंतर.. 10 सेकंदांनंतर हीटर रॉड पाण्यातून काढून टाकणे चांगले.
  • धातूच्या बादलीमध्ये वॉटर हीटर ठेवू नका, कारण विद्युत प्रवाह लोखंडातून वाहतो.
  • पाणी गरम करण्यासाठी प्लास्टिकची बादली वापरणे चांगले.
  • बाजारात स्वस्त वॉटर हीटर खरेदी करू नका. हे दर्जेदार नाहीत. शॉक लागण्याचा धोका असतो.
  • ओल्या हाताने किंवा ओल्या कपड्याने वॉटर हीटरला स्पर्श करू नका. असे केल्याने शॉक बसू शकतो.
  • वॉटर हीटरची नियमित चेक करून सर्विसिंग करावी. यामुळे कोणतीही समस्या आधी ओळखून सोडवता येते.
  • जुने वॉटर हीटर जे बऱ्याच काळापासून वापरात आहेत ते धोक्याचे असतात.

हेही वाचा :

  1. 'भारतीय नौदल दिन' का साजरा करण्यात येतो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
  2. कांद्याच्या सुकलेल्या पापुद्र्याचे अनेक फायदे, फेकून देत असाल तर हे नक्की वाचा
  3. जागतिक मृदा दिवस 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो, महत्त्व काय

Last Updated : Dec 5, 2023, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.