नारळाचे तेल बर्याच वर्षांपासून वापरले जाते. व्हर्जिन नारळ तेल उष्णतेचा वापर न करता नारळाच्या ताज्या, परिपक्व कर्नलमधून नैसर्गिकरित्या मिळवले जाते. जेव्हा आपण त्वचेच्या काळजीबद्दल बोलतो तेव्हा आपण सहसा चेहऱ्याच्या सौंदर्याचा विचार करतो. पण, हात आणि पायांची समान काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सुंदर पोशाख परिधान करता तेव्हा शरीराचा इतर भागही तुमच्या चेहऱ्याप्रमाणे स्वच्छ आणि तेजस्वी दिसला पाहिजे. बॉडी पॉलिशिंग ही एक पद्धत आहे. यामुळे हात आणि पायांना पुरेसा ओलावा आणि चमक मिळते. तसेच त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकल्या जातात. जाणून घ्या खोबरेल तेलाने बॉडी पॉलिशिंग कशी करता येते. विशेषत: सणांच्या निमित्ताने बॉडी पॉलिशिंग करायला हवी.
नारळाच्या तेलामुळे त्वचा मॉइश्चराइज राहते: नारळाचे तेल सुक्ष्म कणांमुळे त्वचेत सहज शोषले जाते आणि त्वचेत अगदी खोलवर जाऊन त्वचेला मॉइश्चराइज करते. त्वचेतील पाण्याची पातळी कमी होण्याचे प्रमाणही यामुळे मंदावते. त्यामुळे नारळयुक्त तेलामुळे त्वचा अधिक काळ मॉइश्चराइज राहते. नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल स्किन बॅरियर सुधारण्यासाठी आवश्यक गुणधर्मांनी युक्त, वाजवी, सुरक्षित आणि शरीरावरील त्वचेसाठी प्रभावी मॉइश्चरायझर आहे.
खोबरेल तेलाचा त्वचेसाठी फायदा (Coconut Oil for Skin) : खोबरेल तेल त्वचेवर मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला डागांपासून दूर ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. याने शरीराला मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. तसेच स्नायूंचा ताणही कमी होण्यास मदत होते. जरी त्वचेवर टॅनिंग दिसू लागले किंवा त्वचा जास्त कोरडी झाली असेल तरीही तुम्ही खोबरेल तेलाने बॉडी पॉलिशिंग करू शकता.
बॉडी पॉलिशिंग कसे करावे (Process of body polishing) : गॅसवर एक पॅन ठेवा. त्यामध्ये तेल हलक्या स्वरुपात गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हळद मिक्स करा. यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यास ठेवून द्या. बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी आधी आंघोळीसाठी हलके कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. यामुळे मृत त्वचा मऊ होईल. या पाण्यामुळे त्वचेवर जमा झालेले बॅक्टेरियाही निघून जातात. यानंतर एका भांड्यात खोबरेल तेल काढावे लागेल. या तेलात अर्धा चमचा हळद घाला. आता हे तेल हात, पाय, मान, पोट इत्यादींवर चोळा आणि हलक्या हातांनी मसाज करा. नियमित १५ ते २० मिनिटे या पेस्टने मसाज करावा. शक्य असल्यास ३० मिनिटे मसाज करावा. यामुळे त्वचेला अधिक फायदे मिळतील. यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि त्वचा चमकदार होते.
बॉडी पॉलिशिंगची पुढची पायरी म्हणजे त्वचा स्क्रब करणे. स्क्रबिंगमुळे त्वचेतील मृत पेशी प्रभावीपणे काढून टाकल्या जातील आणि त्वचा चमकदार दिसेल. बॉडी स्क्रब बनवण्यासाठी अर्धा कप कॉफी घ्या. त्यात समान प्रमाणात ब्राऊन किंवा साधी पांढरी साखर आणि खोबरेल तेल मिसळा. याने शरीर स्क्रब करा आणि नंतर धुवा. ते लावताच त्वचा लोण्यासारखी मऊ होईल.
टीप: विशेष काळजी घ्या की, तुम्ही स्क्रब त्वचेवर खूप घासणार नाही कारण त्यामुळे त्वचेच्या संरक्षणात्मक थराला नुकसान होऊ शकते. याशिवाय जर त्वचा कुठूनही फाटली असेल तर त्या ठिकाणी स्क्रब वापरणे टाळावे.