ETV Bharat / sukhibhava

हायपरपिगमेंटेशन म्हणजे काय? - हायपरपिगमेंटेशन लेख

मेलानोसाइट्स नावाच्या त्वचेच्या पेशी मेलॅनिन तयार करतात, ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. या पेशींमध्ये काही कारणांमुळे रचनात्मक बदल झाल्यास हायपरपिगमेंटेशनची समस्या होऊ शकते. मात्र, यावर उपचार उपलब्ध असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.

Hyper pigmentation
हायपरपिगमेंटेशन
author img

By

Published : Sep 17, 2020, 1:03 PM IST

हैदराबाद - आपण अनेकदा पाहतो, लोकांच्या अंगावर त्याच्या नेहमीच्या रंगापेक्षा गडद असे चट्टे पडलेले दिसतात. यालाच हायपरपिगमेंटेशन म्हणतात. ही काही तशी गंभीर समस्या नाही आणि त्याने कसला धोका निर्माण होत नाही. मात्र, हा प्रकार नेमका आहे तरी काय? याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही काया क्लिनिक्स इंडियाचे एमडी, मेडिकल हेड डॉ. सुशांत शेट्टी यांच्याशी बातचीत केली. ‘तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा त्वचेवर गडद रंगाचे जे चट्टे असतात ते हायपरपिगमेंटेशन असते. बऱ्याचदा हे अनुवांशिक, हार्मोनल किंवा स्वत:च उद्भवलेले असते. ते कधी छोट्या चट्ट्यांच्या रूपात, कधी शरीरावरच्या मोठ्या भागात किंवा कधी पूर्ण शरीरावरही असते,' असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

तज्ज्ञांनी सांगितलेले हायपरपिगमेंटेशनचे प्रकार -

मेलास्मा - हार्मोनल बदलांमुळे मेलास्मा होतो. गरोदरपणात मुख्यत्वे स्त्रियांमध्ये मेलास्मा पोटावर आणि चेहऱ्यावर येतो. अनेकदा पुरुषांच्या अंगावरही हे दिसते.

त्वचेच्या जळजळीनंतर येणारे - तुमच्या त्वचेवर मुरमे किंवा पुरळ येऊन गेल्यानंतर, डास चावल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर त्वचेवर हायपरपिगमेंटेशन दिसून येते. या सगळ्यानंतर त्वचा बरी होते पण त्यावर गडद डाग दिसतात. तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा ते गडद असतात. काही काळानंतर ते दिसतही नाहीत. मात्र, तुम्ही सारखे त्यावर खाजवलेत, त्वचेला बरे होण्याचा वेळच दिला नाहीत तर मात्र हे डाग कायम राहू शकतात.

सूर्यप्रकाशात जास्त वावर - तुम्ही उन्हात जास्त वेळ राहिलात तर हायपरपिगमेंटेशन होऊ शकते. तुमचे कपाळ, डोक्याच्या वर, नाकावर आणि अगदी हातावरही हे डाग दिसतात.

अनुवांशिक - यामुळे शरीरावर चामखिळ किंवा फ्रिकल्स येऊ शकतात.

वैद्यकीय उपचार घेताना - काही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेतानाही त्वचेवर हायपरपिगमेंटेशन दिसू शकते. काही औषधांमुळे त्वचेवर रिअॅक्शन दिसते.

नक्की काय होते ?

मेलानोसाइट्स नावाच्या त्वचेच्या पेशी मेलॅनिन तयार करतात, ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. आपल्या शरीरात मेलॅनिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर अनेक घटक आणि स्थितींचा परिणाम होत असतो आणि यामुळे गडद डाग त्वचेवर येतात. उदाहरणार्थ, शरीराच्या ठराविक भागावर खूप सूर्यप्रकाश पडत असेल तर त्या भागातील पेशी त्वचेवर गडद रंग तयार करतात. जेणेकरून त्वचा खराब होऊ नये आणि तिचे उन्हापासून रक्षण होईल. त्यामुळे त्या भागावर गडद डाग दिसू लागतो.

प्रतिबंध आणि उपचार -

‘हायपरपिगमेंटेशन कशामुळे झाले आहे, हे कारण कळले की मग उपचार करता येतात. हायपरपिगमेंटेशन अनुवांशिक असेल तर फार काही करता येणार नाही. समजा छोटी चामखिळ असेल किंवा छोटा तीळ असेल तर तो काढला जाऊ शकतो. पण शरीराच्या मोठ्या भागावर असेल, म्हणजे समजा चेहऱ्यावर तर मग तिथे मोठा डाग तयार केल्याशिवाय तो काढताच येणार नाही.’ डॉ. सुशांत शेट्टी सांगतात, 'उन्हात गेल्यामुळे हायपरपिगमेंटेशन झाले तर घराबाहेर पडण्याअगोदर सनस्क्रीन लावा आणि स्कार्फ गुंडाळा. तुम्ही सोबत छत्रीही ठेवू शकता. तसेच त्वचा उजळ करण्याचे क्रीम वापरू शकता. या व्यतिरिक्त, हायपरपिग्मेन्टेशनच्या कारणाप्रमाणे उपाय करा.'

काही उपचार पद्धती -

  • रासायनिक द्रव्यांद्वारे डाग काढून टाकणे
  • लेझर उपचार
  • क्यू स्विच लेझर
  • टॉपिकल क्रीम्स
  • लायटनिंग क्रीम्स

डॉ. सुशांत शेट्टी सांगतात, 'त्वचेची काळजी आणि डागाचे कारण हे महत्त्वाचे आहे.’ ते अगदी निरुपद्रवी असते. पण तरीही तुम्हाला ते काढून टाकायचे असेल तर तुमच्या त्वचा रोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. यावर उपचार उपलब्ध आहेत. पण या काळात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, नाही तर अपाय होऊ शकतो. दुहेरी हायपरपिगमेंटेशनही होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.