हैदराबाद - एकदा श्री. थॉमस आपल्या कारने कामावरून घरी येत होते. कार चालवताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही काळ त्यांनी आपली कार रस्त्याच्या बाजूला उभी करून आराम केला व त्यानंतर ते घरी गेले. मात्र, घरी गेल्यानंतर ते आपला उजवा पाय ओढत चालू लागले. त्यांचे संतुलन देखील बिघडले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर थॉमस यांची प्रकृती ठीक झाली. सुदृढ असलेल्या थॉमस यांना अचानक काय झाले होते, याबाबत ईटीव्ही भारत सुखी भवने अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी गोव्यातील व्हिक्टर रुग्णालयाच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अँटोनिओ फिग्युरेडो यांच्याशी आम्ही संपर्क केला.
मेंदूला होणाऱ्या सामान्य दुखापती -
मेंदूला होणाऱ्या काही दुखापती या ट्रॉमॅटिक(दीर्घकालीन दुखापत) असतात तर काही नॉन ट्रॉमॅटिक(अचानक झालेली दुखापत).
ट्रॉमॅटिक दुखापतींमध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या आसपास वारंवार रक्तस्राव होतो.
नॉन ट्रॉमॅटिक दुखापतीमध्ये मेंदूला अचानक मार लागल्याने किंवा मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडीत झाल्याने रक्तस्राव होतो.
मेंदूच्या न दिसणाऱ्या दुखापती कशा ओळखाव्यात?
1. चेहऱ्यावर थकवा जाणवणे, हाताचे दंड आणि पाय कमकुवत होणे(विशेषत: शरीराची एक बाजू), एखाद्या वस्तूवरील हाताची पकड सैल होणे, शरीर अचानक सैल पडणे, ही सर्व लक्षणे मेंदूच्या दुखापतींची आहेत.
2. सततची डोकेदुखी, गोष्टी समजून घेताना सतत गोंधळ होणे, बोलताना अडचण येणे ही देखील मेंदू ठीक नसल्याची लक्षणे आहेत.
3. डोळ्यांची दृष्टी अचानक कमी होणे.
4. आवाजात अचानक बदल होणे, वारंवार मळमळ होणे, अन्नपदार्थ गिळण्यास अडचण येणे.
5. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांचे आकलन न होणे.
6. मूत्रविसर्ग नियंत्रणात न ठेवता येणे. यापैकी काही लक्षणे दिसत असतील तर, नक्कीच त्या व्यक्तीचा मेंदू सुदृढ नाही.
न्युरोलॉजिस्टची भेट कधी घ्याल ?
वरीलपैकी काही लक्षणे जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
काही वेळा रुग्णाला वर सांगितल्यापैकी एकही लक्षण नसते किंवा कधी तरीच त्यांना लक्षणे जाणवतात, अशा वेळी अंदाज लावणे कठीण असते. मात्र, काही गडबड जाणवल्यास व्यक्तीने तत्काळ न्यूरोलॉजिस्टकडे जाणे गरजेचे आहे.
मेंदूसंबंधीत दुखापती टाळण्यासाठी काय उपाय कराल?
संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि धुम्रपान टाळणे मेंदू संबंधीत आजार टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा antonio15sept@gmail.com