सुमारे 90 टक्के तरुनांना धूम्रपान करणार्यांची सवय किशोरवयातच सुरू केली. बहुतेक किशोरवयीन मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने धूम्रपानाचे व्यसन करतात. एका संशोधनानुसार, 25 टक्के किशोरवयीन मुले तंबाखूचा वापर करतात. धूरविरहित तंबाखूचा वापर कमी प्रमाणात केला जात असला तरी, भारतात 13 ते 15 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. पॅनीक अटॅक, मॅनिक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, चिंता, ताण, झोपेची कमतरता, क्लॉस्ट्रोफोबिया, ऍगोराफोबिया इत्यादी विकार किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येतात. धूम्रपानामुळे तणाव कमी होतो, असा विश्वास तंबाखूचे सेवन करणाऱ्यांंमध्ये निर्माण झाला आहे. जेव्हा निकोटीन शरीरात प्रवेश करते तेव्हा, तणावाची पातळीत काही प्रमाणात कमी होते. मात्र, यामुळे तंबाखुचे व्यसन जडण्याची दाट शक्याता असते. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कोविड विषाणुचा प्रसार अधिक वेगाने होत, असल्याचे निर्दशनाश आले आहे.
धूम्रपानामुळे दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, फुफ्फुसांची वाढ मंदावणे, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी आजार बळावणे, मधुमेह, कर्करोग यासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. पौगंडावस्थेतील धूम्रपानास विविध घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये पालकांचे धूम्रपानाचे व्यसन, कौटुंबिक पार्श्वभूमी, आत्मविश्वास, धूम्रपान करणारी भावंडे, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक समस्या, दुय्यम वर्तणूक, बदलती जीवनशैली, वाढता तणाव, चुकीच्या समजूती आदी सामान्य कारणे दिसून येतात. आजच्या किशोरवयीन मुलांना व्यसनापासून कसे दुर ठेवता येइल? त्यांना कसे मार्गदर्शन करता येइल त्यासाठी पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
मुलांसमोर धूम्रपान करू नका - बहुतेकदा धुम्रपान करणाऱ्या किशोरवयीन मुलांवर पालकांचा प्रभाव असतो. पालक या नात्याने, तुम्ही चांगले त्यांच्यासमोर चांगले उदाहरण मांडणे अत्यावश्यक आहे. वडिलांनी मुलांसमोर धूम्रपान करू नये, आवश्यक असल्यास, वडिलांनी स्वत: धूम्रपान सोडण्याची गरज आहे. जर, तुमच्याकडून धुम्रपान सोडणे शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगायला हवे.
मुलांचा मानव समजून घ्या - किशोरवयीन मुले सहसा समवयस्कांच्या दबावामुळे धूम्रपान करतांना दिसतात. तसेच, एका विशिष्ट गटात स्थान निर्माण करण्यासाठी धूम्रपान करतांना दिसून येतात. सिगारेट उत्पादक कंपन्या जाहिरातींद्वारे धूम्रपानाविषयी मिथक तयार करतात त्यामुळे मुलांमध्ये धुम्रपानाविषयी आकर्षण निर्माण होते. यावर तुम्ही मुलांसोबत संवाद करण्याची गरज आहे.
नकार द्याला शिकवा - तुमच्या मुलाला नकार द्याला शिकवा. मित्रांच्या दबावाबद्दल तुमच्या मुलांना समजवून सांगा. सामाजिक परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण त्यांना द्या.
धूम्रपानाची किंमत - धूम्रपानामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक समस्याच उद्भवत नाहीत, तर खिशालाही मोठा फटका बसतो. त्यांनी समजावून सांगा की, धूम्रपान करण्यावर वाया जाणारा पैसा एखाद्या योग्य गोष्टीसाठी वापरला जाऊ शकतो.
भविष्याचा विचार करा - धुम्रपानामुळे होणारे दिर्घकालीन परिणाम त्यांच्याशी चर्चा करा. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजरांबद्दल मित्र, शेजारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे सांगा.
धूम्रपान विरोधी मोहिमेत स्वतःला गुंतवून घ्या - प्रायोजित धूम्रपान प्रतिबंध मोहिमांमध्ये सहभागी होऊन धूम्रपान विरोधी मोहिमेचा भाग व्हा. सार्वजनिक ठिकाणे धूरमुक्त करण्यासाठी तंबाखू उत्पादनांवर कर वाढवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या. या व्यतिरिक्त, विविध हेल्पलाइन, सामाजीक संस्थाची मदत घेवून धुम्रपान करणाऱ्याांना त्यापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा.
(डॉ. श्रद्धा शेजेकर, सल्लागार - मानसोपचार, ASTER RV हॉस्पिटल) (IANS)
हेही वाचा- Male contraceptive pills : पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांबाबत नवे खुलासे
हेही वाचा- Good Night Sleep : चांगली झोप घेण्यासाठी 'या' मार्गांचा करा अवलंब