ETV Bharat / sukhibhava

सुख शोधायचे की मानायचे? हे आहेत आनंदाने जगण्याचे मंत्र - आरोग्याकडे लक्ष द्यावे

पैसा, प्रसिद्धी आणि  सत्ता या तीन गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या मते 'यश' (Success) या संकल्पनेशी निगडित असतात. परंतु हे सगळे मिळाले, म्हणजे माणूस सुखी होतो का? आपण सुख शोधायचे की मानायचे? आनंदाने जगण्याचे बरेच मंत्र आहेत. खरे तर यावर आपण विचार करायला पाहिजे.

mantras for living happily
आनंदाने जगण्याचे मंत्र
author img

By

Published : Oct 27, 2022, 11:22 AM IST

पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता या तीन गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या मते 'यश' (Success) या संकल्पनेशी निगडित असतात. परंतु हे सगळे मिळाले, म्हणजे माणूस सुखी होतो का? आपण सुख शोधायचे की मानायचे? हे सारे प्रश्न कधी ना कधी किंवा नेहमीच तुम्हा-आम्हाला भेडसावत असतात. खरे तर यावर आपण विचार करायला पाहिजे. त्याची उत्तरे कधी मिळतात, तर कधी नाही.

सकारात्मक वृत्ती आणि स्वयंप्रेरणा: सकारात्मक वृत्ती आणि स्वयंप्रेरणा हे दोन घटक नसतील, तर यशाची पहिली पायरी गाठणेही अवघड ठरेल. त्यामुळेच सकारात्मक वृत्ती टिकवायची कशी आणि स्वयंप्रेरित व्हायचे कसे, याबाबत चांगल्या व्यत्तीकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ते नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल.

वेळ निसर्गरम्य वातावरणात घालवावा: आपल्याला अनेकदा मानसिक तणाव जाणवतो. कितीही मानसिक तणाव असला तरी निसर्गाच्या कुशीत येऊन मन नेहमी शांत होते. आपण निसर्गापासून दूर राहू शकतो, पण जेव्हा केव्हा हिरवळ, झाडे किंवा पक्षी आसपास असतात तेव्हा मनाला शांत वाटते. निसर्गापेक्षा जास्त 'हिलिंग पॉवर' कोणाकडेच नाही. नैराश्याने (depression) ग्रासलेल्यांना काही दिवस निसर्गाच्या कुशीत घालवण्याच्या सूचनाही दिल्या जातात. अशावेळेस काही वेळ निसर्गरम्य वातावरणात घालवावा. त्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही.

अपयशाचे कारण शोधले पाहिजे: बऱ्याचदा आपल्याला अपयश येते, पण ते का आले, हे कळत नाही. त्यावेळेस शांत राहून अपयशाचे कारण शोधले पाहिजे. तसेच आपल्यामध्ये काही कमतरता असल्याचे जाणवत असते, मात्र काय कमतरता आहेत, आपण कुठे कमी पडतोय, हे बघितले पाहिजे.

व्यक्तिमत्त्वही चांगले असणे गरजेचे: ज्ञानासोबतच स्वत:चे व्यक्तिमत्त्वही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे शब्दांशिवाय संवाद आणि देहबोली, देहबोलीशिवाय संवाद साधणारे अन्य घटक, डोळे आणि दृष्टीभेट, चेहऱ्यावरचे हावभाव, हस्तांदोलन आणि दोन व्यक्तींमधील अंतर अशा गोष्टी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

आरोग्याकडे लक्ष द्यावे: नेहमी पोषक आहार घ्यावा. खाण्यापिण्यामुळेही आपला आनंद द्विगुणीत होऊ शकतो. तसेच झोपेवरही नियंत्रण असायला हवे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.