ETV Bharat / sukhibhava

'या' प्राण्याची नॅनोबॉडी कोविड - 19 विरोधात ठरू शकते प्रभावी, संशोधनातून समोर - llamas Nanobody for covid treatment

जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोविड - 19 लसीकरण मोहीम सुरू होऊन बरेच महिने उलटले आहेत, तरी विषाणूने संसर्गित होण्याची भीती असतेच, कारण अजूनपर्यंत त्यावर प्रभावी उपचार नाही. परंतु, अलीकडे झालेल्या आभ्यासात असे दिसून आले आहे की, दक्षिण अमेरिकी उंट किंवा लामाद्वारे तयार छोटे अँटिबॉडी कोविड 19 विरोधात एक नवा उपचार देऊ शकतात.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 3, 2021, 5:37 PM IST

दक्षिण अमेरिकेत आढळणारे लामा म्हणजे उंटाच्या शरीरात तयार होणारा एक अद्वितीय प्रकारचा छोटा अँटिबॉडी कोविड 19 वर नव्या पद्धतीने उपचारात प्रमुख भूमिका बजावू शकतो. उपचारासाठी रुग्ण इंजेक्शन ऐवजी त्यास अनुनासिक स्प्रे म्हणून माध्यमातून घेऊ शकतात.

llamas antibodies and covid study
दक्षिण अमेरिकेत आढळणारे लामा

यूकेमध्ये रोजालिंड फ्रँकलिन इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना नव्या संशोधनात असे दिसून आले की, नॅनोबॉडी - लामा (उंट) द्वारे उत्पन्न अँटिबॉडीचा एक छोटा प्रकार, कोविड 19 चा व्हेरिएंट सार्स कोविड 2 विषाणूला प्रभावीपणे लक्ष करू शकतो.

संशोधकांना असे दिसून आले की, रेणूंच्या लहान साखळ्या ज्या प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात तयार केल्या जाऊ शकतात, संक्रमित प्राणी मॉडेल्सना दिल्यास त्या कोविड 19 रोगाची लक्षणे लक्षणीयरीत्या कमी करतात.

नेचर कम्युनिकेशन नावाच्या मासिकेत प्रकाशित परिणाम कोविड - 19 विरोधात एका नव्या प्रकारच्या उपचाराला विकसित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. ते स्वस्त आणि उत्पादनाच्या बाबतीत स्वस्त आहे. अँटिबॉडी आणि कोल्ड स्टोरेज सुविधेत संग्रहित करण्याची गरज नाही आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंड म्हणाले की, संशोधनानुसार नॅनोबॉडीमध्ये कोविड 19 प्रतिबंध आणि उपचार दोघांची क्षमता आहे. हे सर्वात प्रभावी सार्स कोविड 2 ला अप्रभावी करणाऱ्या एजंटमधून एक आहे.

शोधपत्राचे प्रमुख लेखक प्रोफेसर रे ओवेन्स जे संस्थेमध्ये प्रोटीन उत्पादनाचे प्रमुख आहेत म्हणाले की, मानव अँटिबॉडीपेक्षा नॅनोबॉडीचे अनेक फायदे आहेत. ते उत्पादन करण्यात स्वस्त आहे आणि नेबुलायझर किंवा अनुनासिक स्प्रेच्या माध्यमातून थेट वायुमार्गामध्ये पोहोचवले जाऊ शकतात. त्यामुळे, त्यास इंजेक्शन ऐवजी घरी स्वत: वापरता येऊ शकते. ते थेट श्वसन मार्गात संसर्गाच्या ठिकाणी जाऊन देखील उपचार करतात.

पथकाने सार्स कोविड 2 स्पाइक प्रोटीनच्या एका भागाला फिफी नावाच्या लामामध्ये इंजेक्ट करून नॅनोबॉडी तयार केली आहे. इंजेक्शनने फिफीला आजारी केले नाही तर, त्याने विषाणूच्या प्रोटीन विरुद्ध नॅनोबॉडी निर्माण करून त्याच्याशी लढण्यासाठी तिच्या रोगप्रतिकार प्रणालीला ट्रिगर केले. तेव्हा लामापासून एक छोटा रक्ताचा नमुना घेण्यात आला. संशोधक कोविड - 19 विषाणूला बांधल्या जाण्यास सक्षम असलेल्या चार नॅनोबॉडींना शुद्ध करण्यास सक्षम होते.

पथकाला असे आढळले की, नॅनो साखळ्या कोविड 19 विषाणूचा मूळ व्हेरिएंट आणि अल्फा व्हेरिएंट दोघांनाही अप्रभावी करण्यात सक्षम होते, ज्यांची ओळख पहिल्यांदा यूकेमध्ये पटली होती. एक चौथी अँटिबॉडी साखळी आधी दक्षिण अफ्रिकेत ओळख पटलेल्या बीटा व्हर्जनला अप्रभावी करण्यास सक्षम होती.

- आईएएनएस

हेही वाचा - काही लोक इतरांच्या तुलनेत लवकर बरे कसे होतात? या संशोधनातून मिळू शकते उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.