ETV Bharat / sukhibhava

दररोज 7 हजार पावले चालल्याचे 'हे' आहेत फायदे - चांगल्या आरोग्यासाठी वॉक

चांगल्या आरोग्यासाठी बहुतांश तज्ज्ञ वॉक करण्याचा सल्ला देतात. नुकतेच झालेल्या एका संशोधनातही असे समोर आले आहे की, जर एखादी व्यक्ती दररोज 7 हजार पावले चालत असेल तर, त्याच्यात कमी पावले चालणाऱ्याच्या तुलनेत कमी मृत्यू दर दिसून येते.

walk
चालने
author img

By

Published : Dec 27, 2021, 4:44 PM IST

चांगल्या आरोग्यासाठी बहुतांश तज्ज्ञ वॉक करण्याचा सल्ला देतात. नुकतेच झालेल्या एका संशोधनातही असे समोर आले आहे की, जर एखादी व्यक्ती दररोज 7 हजार पावले चालत असेल तर, त्याच्यात कमी पावले चालणाऱ्याच्या तुलनेत कमी मृत्यू दर दिसून येते. विशेष म्हणजे, 2020 साली प्रकाशित एका अन्य संशोधनातही असे समोर आले होते की, जे लोक दररोज 8 हजार पावले चालतात त्यांना 4 हजार पावले चालणाऱ्याच्या तुलनेत मृत्यूचा धोका खूप कमी असतो.

जीएएमए (GAMA) मध्ये प्रकाशित झालेल्या एका आभ्यासातून असे समजले आहे की, जर एक व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिली आणि दररोज सुमारे 7 हजार पावले चालली तर, मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्के कमी होऊ शकतो. कोरोनरी रिस्क डेव्हलपमेंट इन यंग अडल्ट या आभ्यासाचा भाग राहिलेल्या या संशोधनात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या 4 राज्यांमधील 38 ते 50 वर्षांपर्यंतच्या जवळपास 2 हजार 110 तरुणांना विषय बनवण्यात आले होते. यात 1 हजार 205 महिलांचा समावेश होता आणि या संशोधनात 888 लोकं अश्वेत होते.

या संशोधनातील सहभागी 2005 ते 2006 दरम्यान दररोज आपल्या पायांवर एक्सेलेरोमीटर घालून सरासरी पावले चाललीत. या दरम्यान त्यांनी या यंत्राला केवळ झोपताना किंवा असे काही कार्य करताना जे पाण्यात होणारे होते, या दरम्यान काढले. संशोधनकर्त्यांनी या शोधाचा भाग राहिलेल्या सहभागींच्या आरोग्याचे 10.8 वर्षांपर्यंत नियमित निरीक्षण केले. या कालावधीत संशोधनाचा विषय राहिलेल्या तरुणांमध्ये 72 म्हणजेच 3.4 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता.

संपूर्ण आरोग्याचे निरीक्षण

या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यासाठी 3 वर्ग निश्चित करण्यात आले होते. पहिल्या वर्गात सहभागींना दररोज 7 हजारपेक्षा कमी पावले चालायचे होते. दुसऱ्या वर्गात सहभागींना 7 हजार ते 9 हजार पावले चालायचे होते आणि तिसऱ्या वर्गात सहभागींना दररोज 10 हजारपेक्षा अधिक पावले चालायचे होते. सहभागींच्या सरासरी दैनिक पवालांची गणना करण्याव्यतिरिक्त संशोधकांनी त्यांच्या सरासरी पावलांची तीव्रता देखील मोजली. त्यांनी सहभागींच्या 30 मिनिटांत प्रति मिनिट पावलांच्या उच्च संख्येला मोजले, त्याचबरोबर दररोज सहभागी 100 पावले चालण्यासाठी 1 मिनिटापेक्षा किती अधिक वेळ घेतात, हे देखील जाणून घेतले.

संशोधनाच्या या कालावधीत व्यक्तीमध्ये धुम्रपानाचा इतिहास, त्यांचे वजन, शरीराचे वस्तुमान ( BMI ), कोलेस्टेरॉल आणि फास्टिंग ब्लड ग्लुकोस, अल्कोहोलच्या सेवनाची पातळी, रक्तदाब, उच्च रक्तदाब, हाई कोलेस्टेरॉल आणि मधुमेहासाठी घेतलेल्या ओषधांचा तपशील आणि हृदय रोगांचे देखील निरीक्षण करण्यात आले.

संशोधनात असे समोर आले की, जे सहभागी दररोज 7 हजार पावले किंवा त्यापेक्षा अधिक पावले चाललेत, त्यांच्यात मृत्यूदराचा धोका त्या लोकांच्या तुलनेत 50 ते 70 टक्के कमी होता जे दररोज 4 हजारपेक्षा कमी पावले चालले होते. तथापि, दररोज 10 हजार पावले चालणाऱ्या सहभागींमध्ये मृत्यूदराची आकडेवारी अजून जास्त कमी असल्याची बाब समोर आली आहे.

सीडीसीनुसार (CDC) शारीरिक क्रियाकलापांचे फायदे

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार, शरीरिक हालचाल आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला लाभ पोहचवते. सीडीसीनुसार, वेगाने चालणे किंवा ब्रिस्क वॉकिंगसारख्या नियमित शारीरिक हालचालींचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

1) हाडे आणि स्नायू बळकट होतात.

2) हृदय रोग आणि टाईप - 2 ( Type - 2 ) मधुमेहाचा धोका कमी होतो.

3) विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

4) झोपेच्या गुणवत्तेत सुधार होते.

5) नैराश्य आणि चिंता यांचा धोका कमी होतो.

6) विचार करणे आणि शिकण्याचे कौशल्य चांगले करण्यास मदत मिळते.

हेही वाचा - हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.