महिला असो किंवा पुरुष, अंतर्वस्त्रांचा वापर सगळेच करतात. महिला आणि पुरुष दोघांसाठीही बाजारात विविध प्रकारचे अंतर्वस्त्र मिळतात, मात्र बहुतांश लोकांना त्यांची नावे माहिती नाही. विशेषकरून, महिलांना अंतर्वस्त्रांचे प्रकार आणि त्यांच्या नावांबाबत माहिती नसते. तसेच, बहुतांश महिलांना त्यांनी कोणत्या प्रकारचे अंतर्वस्त्र विकत घ्यावे, याबद्दल देखील माहिती नसते. या पार्श्वभूमीवर महिलांच्या अंतर्वस्त्रांशी संबंधित काही खास माहिती 'ईटीव्ही भारत सुखीभव' आपल्या वाचकांसाठी शेअर करत आहे.
महिलांच्या अंतर्वस्त्रांचे अनेक प्रकार आहेत
अंतर्वस्त्रांचे प्रकार आणि नावांबाबत केवळ छोट्या शहरांमधीलच नव्हे, तर मोठ्या आणि मेट्रो शहरात राहणाऱ्या बहुतांश महिलांना देखील अधिक माहिती नसते, त्या अनेकदा पारंपरिक अंतर्वस्त्रांचाच वापर करतात, मग तो दिवस विशेष असो किंवा सामान्य. महिलांच्या अंतर्वस्त्रांचे विशेष प्रकार पुढीलप्रमाणे आहेत,
ब्रीफ किंवा हिरवी चड्डी (panties)
ब्रीफ केवळ पुरुषांच्याच अंतर्वस्त्राला म्हणत नाही तर, बाजारात महिलांचे ब्रीफ देखील मिळतात. ती कंबरेचा अधिकांश भाग आणि मांड्यांच्या वरील भागांना व्यापते. या प्रकारची चड्डी जास्त आकर्षक नसते, परंतु ती खूप आरामदायक मानली जाते.
हाई कट ब्रीफ
हाई कट ब्रीफची उंची ही ब्रीफ इतकीच असते, मात्र त्यात साइड कट असतात. ब्रीफच्या तुलनेत हाई कट ब्रीफमध्ये व्ही आकाराच्या (v) चड्डी सारखा कंबरेचा पुढचा आणि मागचा बराचसा भाग दिसतो.
बॉय शॉर्ट्स
बॉय शॉर्ट्स चड्डी पुरुषांच्या अंतर्वस्त्रा सारखी आहे. तिला ब्लूमर्स या नावाने देखील ओळखले जाते.
हिपस्टर्स किंवा हिप हगर्स
नावाप्रमाणे या चड्डीची वरील इलास्टिकची पट्टी (वेस्टबँड) कंबरेच्या मागच्या भागाच्या आकारानुसार असते, तसेच ती हिप्सवर फिट बसते, त्यामुळे तिला हिपस्ट्रेस किंवा हिप हगर्स असे म्हणतात.
बिकिनी
बिकिनी चड्डी गुप्तांगांवर व्ही (v) आकारात घट्ट किंवा चिकटलेली असते. या प्रकारची चड्डी आकर्षक स्टाइलमध्ये मिळते. तिला विशेषकरून बीच वेयर या नावाने ओळखले जाते.
चीकी
चीकी ही चड्डी दिसायला बिकिनी सारखी असते, मात्र तिच्यात कंबरेच्या मागील भागात (हिप्स वर) कवरेज कमी असते.
थाँग्स
थाँग्स चड्डीमध्ये कंबरेचा बहुतांश मागचा भाग कपड्याच्या आवरणापासून मुक्त असतो आणि तिच्यात हिप्स दिसून येतात.
जी स्ट्रिंग
थाँग्स आणि जी स्ट्रिंग अंदाजे एकच श्रेणीच्या चड्ड्या आहेत. जी स्ट्रिंग चड्डीमध्ये पार्श्व भागात नगण्य कवरेज असते. चड्डीचा मागल्या भागातील कापड फक्त एका दोरीच्या रुपात दिसून येतो, तसेच समोरून देखील चड्डीची रुंदी खूप कमी (एक पातळ पट्टी सारखी किंवा स्ट्रिंग सारखी) असते.
पोस्ट प्रेग्नेंसी चड्डी
या प्रकारची चड्डी स्त्रिया मुलाच्या जन्मानंतर घालू शकतात. या प्रकारची चड्डी हाईवेस्टची असते जी नाभीपासून वरपर्यंतचा भाग झाकते. ही चड्डी घातल्याने महिलांना मुलांना जन्म दिल्यानंतर वाढलेल्या पोटाला कमी करण्यास मदत मिळते आणि कंबरेलाही आधार मिळतो.
पीरियड चड्डी
पीरियड चड्डी मासिक पाळीदरम्यान महिलांद्वारे घातले जाणारे अंतर्वस्त्र आहे. जगभरातील महिला पीरियडच्या काळात आरामदायक असल्याने तिला खूप पसंत करतात. मासिक पाळीदरम्यान पीरियड अंतर्वस्त्र लिक्विड पदार्थांना शोषून घेते. महिला त्यांना पॅडशिवाय देखील वापरू शकतात. इतकेच नव्हे तर, ज्या महिला पांढरा स्त्राव किंवा मूत्र गळण्याच्या समस्येपासून त्रासल्या आहेत, त्या देखील हे अंतर्वस्त्र कोणत्याही काळजीशिवाय वापरू शकतात.
अंतर्वस्त्र विकत घेताना पुढील बाबी लक्षात ठेवा
- महिलांनी अंतर्वस्त्र विकत घेताना त्यांचे रंग आणि स्टाईल व्यतिरिक्त काही इतर बाबींना देखील लक्षात ठेवले पाहिजे.
- प्रत्येक महिलेचा शरीराचा आकार हा वेगळा असतो, त्यामुळे तुमच्या शरीराच्या आकारानुसारच आरामदायक चड्डीची निवड केली पाहिजे.
- नेहमी योग्य आकाराचेच अंतर्वस्त्र विकत घेतले पाहिजे. जर स्त्रियांनी छोट्या आकाराचे अंतर्वस्त्र घातले तर, त्यांना केवळ अस्वस्थ वाटणार नाही तर, त्यांना योनीत संसर्ग आणि त्याच्या आजूबाजूला पुरळ होण्याचाही धोका होऊ शकतो.
- लेस असणारे अंतर्वस्त्र किंवा थाँग्स जे सामान्यत: नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स सारख्या सिंथेटिक कापडाने तयार होतात, गुप्तांगांच्या आजूबाजूला असलेल्या त्वचेवर उष्णता आणि आर्द्रता निर्माण करतात. त्यांना दीर्घकाळ परिधान केल्यास त्वचेवर पुरळ येऊ शकते.
- नियमित घालण्यासाठी कॉटनचे अंतर्वस्त्र सर्वोत्तम असतात.
हेही वाचा - योग करण्यापूर्वी 'या' टिप्स नक्की वाचा, चांगले परिणाम मिळण्यास होईल मदत