ETV Bharat / sukhibhava

Babies Teething : बाळाला दात निघताना अशी घ्या काळजी; पोटदुखी, हिरड्या दुखीपासून मिळेल सुटकारा - Teething

मुलांना दात निघताना पोटदुखी आणि हिरड्या दुखीचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे फक्त चिमुकली मुलेच नाही, तर त्यांच्या पालकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी बंगळुरू येथील बालरोग तज्ज्ञ डॉ टी एस राव यांनी ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी खास माहिती दिली आहे.

Babies Teething
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 26, 2023, 1:10 PM IST

हैदराबाद : बाळांना दात येण्याचा काळ हा त्यांच्यासह पालकांसाठीही मोठा त्रासदायक काळ असतो. आपल्या चिमुकल्यांना दात येताना त्यांना केवळ हिरड्या दुखीचा त्रास होत नाही. तर या काळात अनेक कारणांमुळे मुले खूप संवेदनशील होतात. या समस्या कमी करण्यासाठी काही खबरदारी घेणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांची पोटदुखी आणि हिरड्यादुखी कमी होऊ शकते.

दात येताना काय घ्यावी खबरदारी : बाळाच्या जन्मानंतर पाच ते सहा महिन्यांनी त्यांचे दात निघू लागतात. लहान मुलांचे दात येणे ही केवळ मुलांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांसाठीही त्रासदायक असते. या काळात बहुतेक मुलांना पोटदुखी, ताप, हिरड्या दुखणे आणि इतर काही समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांची चिडचिड होते. या काळात ते फार रडायला लागतात. मात्र काही खबरदारी घेतली तर मुलांना दात निघताना त्रास कमी होतो. दात येण्याच्या काळात मुलांना होणाऱ्या त्रासापासून कशी सुटका व्हावी, तो त्रास कसा कमी करावा आणि आपल्या चिमुकल्याच्या तोंडाची कशी स्वच्छता राखावी याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत सुखी भवने बंगळुरूचे बालरोगतज्ञ डॉ. टी. एस. राव यांच्याकडून माहिती घेतली.

का होतो दात निघताना त्रास : बालरोग तज्ञ डॉ. टी. एस. राव यांनी दात येण्याचा कालावधी काही मुलांसाठी खूप त्रासदायक असू शकतो असे सांगितले. मात्र काही मुलांमध्ये हा काळ अगदी किरकोळ समस्यांसह सहज निघून जातो. दात येण्याआधीच मुलांच्या हिरड्यांना खाज यायला लागते. त्या दुखायला लागतात. तर कधी कधी फुगतातही असे डॉ राव यांनी सांगितले. दुसरीकडे हिरड्यांच्या त्वचेतून दात वारंवार येत नाहीत. उलट ही एक संथ प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला काही दिवस लागतात. अशा स्थितीत हिरड्यांमध्ये दात येताना होणारी अस्वस्थताही लगेच बरी होत नसल्याचेही डॉ राव यांनी स्पष्ट केले. लहान मुलांचे दात येण्याच्या सुरुवातीपासून ते दात पूर्ण फुटेपर्यंत, त्वचेतून दात बाहेर येण्याचा काळ अधिक वेदनादायक असतो. विशेषत: ज्या मुलांचे दात आधी बाहेर पडतात, त्यांना यावेळी जास्त त्रास सहन करावा लागतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुलांना त्यांच्या समस्या मांडता येत नाहीत : असे असले तरी लहान मुलांचे दात पाच ते सहा महिन्यांनी बाहेर येऊ लागतात. या वयात मुलांना त्यांच्या समस्या बोलून मांडता येत नाहीत. त्यामुळे ते अधिक चिडचिड करतात. जास्त रडायला लागतात. या स्थितीमुळे त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या समस्या आणखी वाढतात असेही डॉक्टर राव यावेळी म्हणाले. जन्मानंतर बाहेर येणारे हे दात तात्पुरते असतात. ते काही वर्षांनी तुटतात त्यानंतर त्यांचे कायमचे दात त्यांच्या जागी पुन्हा बाहेर येतात. मुलांच्या या तात्पुरत्या दातांना दुधाचे दात असे म्हणतात. प्रौढांच्या तोंडात 32 दात असतात. परंतु दुधाचे दात 20 असतात असेही डॉक्टर राव यांनी यावेळी सांगितले. चिमुकल्याला 10 दात वर आणि 10 दात खाली यायला सुमारे तीन वर्षे लागत असल्याचेही डॉक्टर राव यांनी यावेळी सांगितले.

मुलांना कोणत्या समस्यांचा होतो त्रास : मुलांना दात येण्यास सुरवात झाल्यानंतर त्यांच्या हिरड्या दात येण्याआधीच या प्रक्रियेची तयारी करू लागतात. त्यामुळे त्यांच्या हिरड्या खाजायला लागतात आणि नंतर सूज येते. त्याला सामान्य भाषेत जबड्याची सूज देखील म्हणतात. मग त्वचेतून दात येण्याची वेळ जसजशी जवळ येते आणि त्वचेतून दात बाहेर येऊ लागतात, तसतसे मुलांना त्या ठिकाणी वेदना होऊ लागतात. या प्रक्रियेत त्यांच्या जबड्याला जोडलेल्या सर्व स्नायूंवरही ताण येतो. त्यामुळे अनेक वेळा कानाशी जोडलेल्या स्नायूंमध्ये समस्या जाणवतात. यामुळे अनेक मुले दात काढताना त्यांचे कान ओढू लागत असल्याची माहितीही डॉक्टर राव यांनी दिली.

मुलाचे पोट खराब होण्याची प्रकरणे : दात येताना अनेक चिमुकल्यांना ताप येत असल्याचे दिसून येतो. पण या अवस्थेत जर मुलाला खूप ताप आला तर त्याला इतर घटकही जबाबदार असू शकतात. त्याचवेळी दात येताना मुलाचे पोट खराब होण्याची प्रकरणे देखील दिसतात. परंतु यासाठी देखील दात येण्याची प्रक्रिया पूर्णपणे जबाबदार मानली जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा मुलांचे दात बाहेर येतात, तेव्हा त्यांच्या हिरड्यांमध्ये खाज सुटणे, वेदना आणि अस्वस्थता असते. जेव्हा असा त्रास होतो, तेव्हा मुले त्यांच्या तोंडात बोटे किंवा हात ठेवतात. मुले त्यांच्या तोंडात काही घालण्याचा प्रयत्न करुन चावतात. त्यामुळे त्यांच्या हिरड्यांची खाज शांत होते. अशा परिस्थितीत हात स्वच्छ नसतील किवा त्यावर जंतू असतील तर ते जंतू पोटात जाऊन पचनसंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे काही वेळा जुलाबासारख्या समस्याही मुलांमध्ये दिसून येत असल्याचेही डॉक्टर राव यांनी यावेळी सांगितले.

त्रासापासून कशी करावी मुलांची सुटका : दात निघण्याच्या प्रक्रियेत मुलांसह त्यांचे पालकही अस्वस्थ होतात. विशेषतः स्तनदा मातांना या काळात काही विशेष समस्यांना तोंड द्यावे लागते. यावेळी बाळ सर्वकाही चघळण्याचा प्रयत्न करत असल्याने, स्तनपान करताना अनेक बाळ आईच्या स्तनाला चावतात. त्यामुळे कधीकधी त्यांच्या स्तनांवर जखमाही होतात. त्याचवेळी तोंड आणि कानात अस्वस्थतेमुळे मुले देखील अधिक रडायला लागतात. त्यामुळे दात निघताना काही उपाय आणि सावधगिरी घेणे गरजेचे असते. ही सावधगिरी संसर्ग, पचन समस्या आणि ताप यासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

  • मुलांच्या शारीरिक स्वच्छतेची, त्यांचे कपडे, खेळणी आणि त्यांच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू किवा त्यांनी वापरलेल्या वस्तूंची विशेष काळजी घ्या.
  • मुले या दरम्यान जास्त लाळ गाळतात. त्यासह हिरड्या खाजत असल्याने ते वारंवार तोंडात हात घालतात. अशा परिस्थितीत हात स्वच्छ करण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासोबतच त्यांची लाळही स्वच्छ रुमाल किंवा कापडाने स्वच्छ करावी.
  • दातांची खाज कमी करण्यासाठी अनेकजण मुलांना टिथर देतात. मात्र टिथरच्या वापरासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणेही खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ, मूल ते तोंडात घालत असल्याने ते नेहमी स्वच्छ आणि जंतूंपासून मुक्त असले पाहिजेत. त्यासह ते खूप कठीण नसून चांगल्या दर्जाचे असावे. मुलाने त्याच्या हिरड्यांना इजा होईल अशा गोष्टी तोंडात घालू नये ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
  • पालक आपल्या चिमुकल्यांना चांगल्या धुतलेल्या भाज्या, फळेही चघळायला देऊ शकता. यामुळे त्यांच्या हिरड्यांवरील खाज सुटण्यापासून आराम तर मिळतोच पण त्यांना पोषणही मिळते. मात्र जोपर्यंत मूल चांगले चावणे शिकत नाही, तोपर्यंत त्याला लहान चिरलेल्या भाज्या किंवा फळे देऊ नयेत. ते त्यांच्या घशात अडकू शकतात. तसेच बियांसह फळे देण्यापूर्वी त्यांच्या बिया पूर्णपणे काढून टाकल्यानंतरच फळे द्यावीत. जर हवामान उष्ण असेल तर मुलांना थंड भाज्या किंवा फळे दिल्यास त्यांना अधिक आराम मिळू शकतो असेही डॉक्टर राव यांनी यावेळी स्पष्ट केले.
  • बोटाने किंवा थंड आणि ओल्या मऊ कापडाने हिरड्यांना हलका मसाज केल्याने देखील या स्थितीत मुलांना आराम मिळू शकतो. विशेषत: स्तनपान करण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी त्यांच्या हिरड्यांना हलक्या हाताने मसाज केल्यास मुले आणि आई या दोघांच्याही समस्या कमी होतात.

मुलाच्या तोंडाची स्वच्छता कशी ठेवावी : दात येण्याआधीच मुलांच्या तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवे, असे डॉ. राव यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दात निघाल्यानंतर दात आणि हिरड्या निरोगी ठेवता येतात. त्याचे फायदे एकंदर आरोग्यापर्यंत पोहोचतात. लहान मुलेही कमी आजारी पडतात. मौखिक स्वच्छता निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि काही चांगल्या सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • जन्मापासूनच मुलांच्या तोंडाची स्वच्छता ठेवा. यासाठी स्वच्छ, मऊ आणि ओल्या कपड्याच्या साहाय्याने दररोज हलक्या हाताने मुलाचे हिरड्या आणि जीभ स्वच्छ करा.
  • ज्या मुलांचा वरचा आहार रोज सुरू झाला आहे, त्यांचे तोंड त्याच प्रकारे स्वच्छ करा. यासोबतच लहान मुलांसाठी अतिशय मऊ आणि विशेषतः उपलब्ध असलेला टूथब्रशही लहान मुलांना देता येईल.
  • ज्या मुलांचे दात हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत, त्यांचे दात दिवसातून दोनदा पुढे ते मागून स्वच्छ करावेत. यामुळे दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवयही पहिल्यापासूनच विकसित होईल.
  • ज्या मुलांचे पाच-सहा दात आले असतील तर त्यांचे दात अगदी कमी फ्लोराईड टूथपेस्टने घासणे सुरू केले जाऊ शकते. पण लक्षात ठेवा की टूथब्रश खूप मऊ असावा आणि टूथपेस्टचा वापर फार कमी प्रमाणात केला पाहिजे. कारण जास्त प्रमाणात फ्लोराईड मुलांसाठी घातक ठरू शकते.
  • दात काढल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी बाटलीतील गोड दूध पिण्याच्या सवयीपासून मुलांना वाचवले पाहिजे. असे केल्याने, दुधाचे कण तोंडात विशेषतः दातांमध्ये रात्रभर राहू शकतात, ज्यामुळे दात किडण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टर राव यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुलांच्या पोषणाची अशी घ्या काळजी : सहा महिन्यांनंतर मुलांना दुधाव्यतिरिक्त डाळी आणि तांदळाचे पाणी, फळांचा रस, पातळ खिचडी, लापशी, नारळाचे पाणी, फळांचा रस आणि भाज्यांचे सूप असा द्रव आहार देण्याची माहिती डॉक्टर राव यांनी दिली. यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने आणि खनिजांसह इतर आवश्यक पोषक घटक आवश्यक प्रमाणात असतात. यासोबतच त्यांना ठराविक अंतराने थोडेसे पाणीही द्यावे. त्यामुळे मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यांना कोणत्याही कारणाने आजारी पडण्याची शक्यताही कमी होईल असेही डॉक्टर राव यावेळी म्हणाले.

मुलांना वेदनाशामक औषध देऊ नये : मुलांना वेदना किंवा अस्वस्थतेपासून वाचवण्यासाठी त्यांना वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे वेदनाशामक औषध देऊ नये, तसेच त्यांच्या हिरड्यांवर कोणतेही मलम किंवा जेल लावू नये. परंतु केवळ दात काढतानाच नाही तर सर्वसाधारणपणे जर मूले सतत आणि जास्त रडत असेल किंवा ताप, जुलाब किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉक्टर राव यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा - Manage Diabetes In Weddings : लग्न समारंभात जायचे आहे; असा संतुलित ठेवा मधुमेह, होईल फायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.