ETV Bharat / sukhibhava

पावसाळ्यात 'हे' त्वचेचे रोग जास्त त्रास देऊ शकतात - त्वचा रोगाची माहिती

उन्हाळ्यानंतर पावसाळा हा मनाला आनंद आणि शरीराला थंडावा देतो. मात्र, तो दमटपणा आणि ओलावा देखील आणतो. या मोसमात विविध आजारांना देखील पेव फुटतात. विविध व्हायरल संसर्गांव्यतिरिक्त त्वचेचे रोगही त्रास देऊ शकतात.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 8, 2021, 5:34 PM IST

पावसाळ्यात त्वचेची चांगली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. बर्कशायर युनायटेड किंगडम येथील त्वचा रोग तज्ज्ञ आणि सुरे स्किनकेयर बर्कशायरचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप सोएन सांगतात की, या मोसमात कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग आणि त्वचा रोग संबंधी समस्यांचा धोका वाढू शकतो.

डॉ. संदीप यांनी 'ईटीव्ही भारत सुखीभवला' सांगितले की, पावासाळ्यात वातावरणाचा त्वचेवर खूप जास्त प्रभाव पडू शकतो. त्याचबरोबर, या मोसमात मुले आणि मोठ्यांना विविध समस्या होऊ शकतात. सामान्यत: या मोसमात सगळ्यात जास्त त्रास देणाऱ्या समस्या पुढील प्रमाणे आहेत,

घामोळे

डॉ. संदीप सांगतात की, घामोळे हा एक सामान्य त्वचा रोग आहे, जो सामान्यत: अशा ठिकाणी होते जेथे ओलावा जास्त असतो आणि हवा सहज पोहचू शकत नाही आणि जेथे जास्त घाम येतो. घामोळ्यात त्वचेवर आलेले दाने खूप खाज निर्माण करू शकतात आणि बरेचदा त्यातून वेदनाही होऊ शकतात. इतकेच नव्हे तर, समस्या जास्त झाल्यावर कधीकधी दान्यांच्या ठिकाणी सौम्य फोडे देखील येऊ शकतात. मात्र, थोडी काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. बहुतांश प्रकरणांमध्ये याच्या उपचारासाठी वैद्यकीय मदतीची गरज पडत नाही.

घामोळ्यांपासून बचावासाठी सर्वात चांगला उपाय शरीराला ठंड ठेवणे आणि ढिले सोडणे हा आहे. शक्य असल्यास सुती कपडे घालावे. घामोळ्या झाल्यावर दान्यांवर कॅलामाईन लोशन आणि खाजेसाठी अँटीहिस्टामाईनचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, घामोळ्यांसोबत सूज असल्यास ती कमी करण्यासाठी स्टिरॉइड क्रीमचा वापर करावा लागू शकतो, अशी माहिती डॉ. संदीप यांनी दिली.

टिनिया क्रूरिस ( जॉक खाज - फंगल संसर्ग)

दमट वातावरणात ही समस्या देखील सामान्यत: लोकांना त्रास देऊ शकते. टिनिया संसर्ग किंवा जॉक खाज हा शरीराच्या कोणत्याही भागांत होऊ शकतो, मात्र तो कंबर आणि त्याचा आसपासच्या भागांत जास्त प्रमाणात होतो. हा संसर्ग हात, मान आणि स्तनांभोवती देखील होऊ शकतो. संसर्गाच्या सुरुवातील दाने आकाराने लहान असतात, मात्र हळू हळू त्यांचा आकार झपाट्याने वाढू शकतो आणि त्यांचे गजकर्णासारख्या (दाद) लाल आणि पपडीदार दान्यांमध्ये रुपांतरण होऊ शकते. ही समस्या झाल्यास सैल आणि हवादार कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजे. टिनियाच्या उपचारासाठी डॉक्टर अँटी फंगल क्रीम आणि टॅबलेटचा वापर करण्याचा सल्ला देतात, जे बाजारात सहज उपलब्ध असतात.

डास आणि इतर कीटकांच्या चाव्यामुळे होणारे त्वचा रोग

डॉ. संदीप सांगतात की, जेव्हा मच्छर चावतात तेव्हा त्यांनी चावलेल्या ठिकाणी काही काळासाठी मोठे गोल सूजलेले डाग निर्माण होतात, ज्यात तीव्र खाज आणि जळजळ होऊ शकते. अशा वेळेस अँटीहिस्टामाइनद्वारे याचा उपचार केला जाऊ शकतो. मात्र, समस्या जर जास्त गंभीर होत असेल तर तात्काळ डॉक्टर किंवा केमिस्टचा सल्ला घ्यायला हवा.

व्हायरल रॅश

पावसाळ्यात डासांचे चावणेच नव्हे, तर त्यांच्यामुळे पसरणारे संसर्ग देखील त्वचा रोगाचे कारण ठरू शकते. बरेचदा डासांच्या चाव्यामुळे त्वचेवर दाने उभरू लागतात. डेंग्यू तापाच्या लक्षणांमध्ये दान्यांचापण समावेश आहे. या दान्यांमुळे खाज सुटू शकते. अशात जर दोन्ही रोगांबरोबर अन्य शारीरिक समस्या देखील दिसून येत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

मुरुम (मुँहासे)

दमट हवामानात किशोरवयीन मुलांच्या त्वचेवर खूप मोठा परिणाम होतो. विशेषत: असे किशोरवयीन युवक-युवती ज्यांची त्वचा अतिशय तेलकट असते, त्यांना ही समस्या जास्त होते, कारण घाम आणि अन्य शारीरिक स्त्राव खूप घाण आकर्षित करतात ज्याने कॉमेडोन आणि सिस्टिक मुरुम भडकू शकतात. जर मुरुम जास्त त्रास देत असतील तर त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते.

सनबर्न

पावसाळ्याच्या महिन्यांत बरेचदा सूर्य आपल्या तीव्रतेवर असतो, अशात सनबर्नची समस्या होऊ शकते. अशात घरातून निघताना सनस्क्रीनचा उपयोग केला पाहिजे आणि थेट सूर्यप्रकाश टाळाला पाहिजे. डॉ. संदीप सांगतात की, प्रत्येक मोसमात त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तिची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, पावसाळ्यात तिची थोडी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी त्वचेसाठी त्वचा स्वच्छ करणे. तिचे एक्सफोलिएशन, टोनिंग आणि मॉइस्च्यूरायझेशन करणे गरजेचे आहे.

या संबंधी अधिका माहितीसाठी www.surreyskincare.co.uk वर संपर्क साधता येईल.

हेही वाचा - मातेचे दूध नवजात बाळाला देते सुरक्षा; स्तनपानाचे 'हे' फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.