हैदराबाद : आज देवाधिदेव भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळवण्याचा खास दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्याचे प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचे व्रत अर्थात शिवरात्री प्रदोष 2023 हे दोन्ही योगायोग एकाच दिवशी आले आहेत. तुम्ही आज व्रत आणि शिव पूजा करून भगवान महादेवाकडून तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. प्रदोष आणि शिवरात्रीचे दोन्ही व्रत भगवान भोलेनाथासाठी ठेवून त्यांची पूजा अर्चना केली जाते. त्यामुळे आज भगवान भोलेनाथांचे भक्त एकाच व्रताने दोन्ही उपवासाचे पुण्य मिळवू शकतात.
जाणून घ्या कधी आहे मासिक शिवरात्री : भगवान भोलेनाथांच्या भक्तांना भोलेनाथांच्या पूजा अर्चना करण्याने सूख शांती मिळते. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 17 मे रोजी रात्री 10.28 पासून सुरू होत असून ती 18 मे रोजी रात्री 09.42 पर्यंत असणार आहे. शिवरात्री पूजेचा मुहूर्त 17 मे रोजी असल्याने आज मासिक शिवरात्री साजरी केली जात आहे.
कधी आहे मासिक शिवरात्रीचा पूजा मुहुर्त : भगवान भोलेनाथांच्या भक्तांवर भोलेनाथांची कृपा अखंड बरसत असते. त्यामुळे भोलेनाथांचे भक्त सदैव भोलेनाथांच्या चरणी लिन झालेले असतात. भगवान भोलेनाथ यांच्या मासिक शिवरात्रीच्या पूजा विधीची तिथीला भोलेनाथ भक्त देवाधिदेवांची पूजा करतात. शिवरात्रीची पूजा विधी सकाळीच सुरू करण्यात येते. मात्र शिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त महत्त्वाचा असतो. मासिक शिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त रात्री 11:57 ते रात्री 12:38 वाजतापर्यंत आहे. या पूजा मुहूर्ताच्या वेळी रात्रीचा मुहूर्त सकाळी 11:00 ते 12:17 वाजतापर्यंत असतो.
कधी आहे प्रदोष व्रताचा मुहूर्त : प्रदोष व्रताची पूजा केल्याने भगवान भोलेनाथ भक्तांना सूख, शांती प्रदान करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भोलेनाथांचे भक्त प्रदोष व्रताची पूजा करतात. प्रदोष व्रताची पूजा आज संध्याकाळी 07.06 वाजतापासून ते 09.10 वाजतापर्यंत करावी. प्रदोष पूजेसाठी हा कालावधी शुभ मुहूर्ताचा आहे. प्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळी करण्यात यावी. त्यामुळे भगवान भोलेनाथ भाविकांवर सुखाची बरसात करत असल्याची भाविकांची धारणा आहे.
हेही वाचा -