ETV Bharat / sukhibhava

Sheet Masks Provide Moisture : शीट मास्कमुळे त्वचेला होतात 'हे' फायदे, जाणून घ्या सविस्तर

तरुणाई सध्या चेहऱ्याची निगा राखण्यावर विशेष भर देत आहे. त्यासाठी अनेकजण शीट मास्कचा वापर करतात. शीट मास्क चेहऱ्यासाठी उपयोगी असल्याचे मत काही सौंदर्यतज्ज्ञ व्यक्त करतात.

Sheet Masks
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 14, 2023, 10:26 AM IST

हैदराबाद : गेल्या काही काळात तरुणींसह तरुणांमध्येही शीट मास्क वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. शीट मास्क हे सौंदर्य प्रसाधन वापरण्यास अतिशय सोपे आहे. त्याचे दुष्परिणाम सहसा दिसून येत नाहीत. त्यासह शीट मास्क त्वचेला आवश्यक आर्द्रता प्रदान करते. त्यामुळे त्वचा चमकदार होऊन अनेक समस्यांपासून मुक्त होते.

शीट मास्क त्वचेला देते ओलावा : सुंदर आणि निरोगी त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक महिला आणि पुरुषही आपली त्वचा उत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. विशेषत: महिला सलूनमध्ये जाऊन फेशियल करून घेतात. बाजारातील नैसर्गिक सौदर्य प्रसाधने किंवा सौंदर्य वाढवणारी उत्पादने वापरतात. आपले सौंदर्य अधिक आकर्षक ठेवण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादने महिला वापरतात. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य उत्पादनांमध्ये अधिक ट्रेंड दिसून येतो. आजच्या काळात त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तरुणींसह तरुणांमध्येही शीट मास्क वापरण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सीरमने भिजवलेला शीट मास्क केवळ त्वचेला मॉइश्चरायझिंगच नाही तर त्वचेला झटपट चमक देण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो.

काय आहे शीट मास्क : त्वचेची निगा हे क्षेत्र नेहमीच खूप प्रगतीशील मानले गेले आहे. परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या युगात स्किनकेअरची व्याप्ती राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय अशी वाढली आहे. आजच्या युगात इतर देशांतील लोकांनाही जगाच्या एका भागात वापरल्या जाणार्‍या सौंदर्य उत्पादनांची संपूर्ण माहिती आहे. कोरियन, जपानी ब्युटी ट्रीटमेंटचा खास भाग मानला जाणारे शीट मास्क आज जगभरात खूप लोकप्रिय होत असल्याची माहिती एमे ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्टच्या सीईओ तथा सौंदर्य तज्ज्ञ नंदिता यांनी स्पष्ट केले आहे.

सीरम त्वचेसाठी आहेत फायदेशीर : शीट मास्क हे कागदापासून बनवलेले असतात. ते बनवताना त्यात विशिष्ट प्रकारच्या फायबर किंवा जेलपासून बनवले जाऊन ते सीरममध्ये भिजवलेले असतात. त्यासह ते चेहऱ्याच्या आकारात कापलेले असतात. हे सीरम त्वचेसाठी फायदेशीर आणि आवश्यक जीवनसत्त्वे, नैसर्गिक तेल आणि इतर पोषक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळे ते त्वचेला आर्द्रता आणि पोषण देतात. हे मुखवटे एकदा वापर करुन फेकण्याच्या पद्धतीने बनवलेले आहेत. हे शीट मास्क किमान 15 मिनिटे चेहऱ्यावर लावला जातात. त्यानंतर शीट काढून टाकल्यानंतर त्वचा धुवायची नसते, परंतु शीट काढून टाकल्यानंतर त्वचेवर जो सीरम राहतो तो देखील हलक्या हाताने चोळला जातो. मसाज करताना त्वचेला सीरमचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. सध्या बाजारात सर्व प्रकारच्या त्वचेसाठी शीट मास्क उपलब्ध असल्याची माहितीही नंदिता यांनी दिली आहे.

शीट मास्कचे फायदे : शीट मास्कचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते त्वचेत आर्द्रता राखते. वातावरणात पसरलेली धुळीची माती, विशेषत: उन्हाळ्यात कडक उन्हाचा प्रभाव, कोरडे वारे, एसीचा अतिवापर, त्वचेवर जास्त मेकअपचा वापर यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा खराब होते. कमी चमक, अकाली सुरकुत्या यासारख्या समस्या होतात. अशावेळी स्वच्छ त्वचेवर शीट मास्क वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि तिचे पोषण होते. त्यामुळे त्वचेशी संबंधित इतर अनेक प्रकारच्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. विशेष म्हणजे केवळ डीप हायड्रेटिंगच नाही तर डिटॉक्सिफायिंग मास्क आणि टॅन केलेल्या त्वचेसाठी शीट मास्क देखील बाजारात उपलब्ध आहेत.

शीट मास्क वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

  • शीट मास्क लावण्यापूर्वी आपली त्वचा फेस वॉश किंवा क्लिंझरने पूर्णपणे स्वच्छ करा. टोनर वापरा, यामुळे त्वचेची पीएच पातळी योग्य राहील.
  • मास्क नेहमी स्वच्छ त्वचेवरच वापरा
  • तुमच्या त्वचेच्या स्वभावानुसार नेहमी शीट मास्क निवडा
  • शीट मास्क चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे ठेवा. पॅकेटमध्ये राहिलेल्या सीरमची मानेवर आणि हातांवर मालिश केली जाऊ शकते.
  • मास्क काढून टाकल्यानंतर गोलाकार पद्धतीने आपल्या चेहऱ्याची मालिश करा. त्यामुळे त्वचेवरील उर्वरित सीरम देखील त्वचेद्वारे शोषले जाईल.
  • शीट मास्क काढून टाकल्यानंतर आपले तोंड धुवू नका.
  • रात्रभर त्वचेवर शीट मास्क लावून झोपू नका.

हेही वाचा - Baisakhi 2023 : पंजाबमध्ये आज साजरा होतोय बैसाखीचा सण; जाणून घ्या, सणाचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.