ETV Bharat / sukhibhava

कोविड-१९चे इतर पेशींमध्ये होणारे संक्रमण रोखणारी औषधे शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश..

author img

By

Published : Jul 5, 2020, 4:19 PM IST

कोरोनाचे विषाणू आपला संसर्ग वाढविण्यासाठी असंसर्गीत पेशींमधील प्रोटीन्सचे अपहरण करत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना अभ्यासादरम्यान आढळून आले आहे. त्याचबरोबर, कोरोनाचा यशस्वीपणे सामना करू शकणारे आणि अमेरिकेच्या एफडीएने मंजूरी दिलेली औषधे देखील शोधली आहेत...

Scientists identify drugs that may block COVID-19 from jumping to other cells
कोविड-१९चे इतर पेशींमध्ये होणारे संक्रमण रोखणारी औषधे शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश..

लॉस एंजेलिस (यूएसए) : कोरोनाचे विषाणू आपला संसर्ग वाढविण्यासाठी असंसर्गीत पेशींमधील प्रथिनांचे अपहरण करून जास्तीत जास्त पेशींमध्ये आपले संक्रमण वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना अभ्यासादरम्यान आढळून आले आहे. त्याचबरोबर, कोरोनाचे संक्रमण रोखू शकणारी औषधे देखील शोधली गेली आहेत.

युरोपियन बायोइन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूट (ईएमबीएल-ईबीआय) आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को (यूसीएसएफ) विद्यापीठामधील संशोधकांनी नमूद केले आहे की, कोरोना विषाणू सार्स-कोव्ह-२ हा यजमान पेशींमधील यंत्रणा नियंत्रणात घेऊन नवीन विषाणू तयार करण्यासाठी त्यामध्ये फेरफार करतात. तसेच ज्या प्रथिनांचे कोरोना विषाणूंकडून अपहरण केले जाते ती प्रथिने आणि यजमान पेशीतील आणि एन्झाईम (उत्प्रेरक) सारख्या इतर महत्त्वपूर्ण रेणूंच्या क्रियाविधीमध्ये व्यत्यय आणला जातो. परिणामी त्यांच्या रासायनिक संरचनेत देखील बदल होतात.

रविवारी 'जर्नल सेल'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी सर्व यजमान पेशी आणि व्हायरल प्रथिनांचे विश्लेषण केले असून सार्स-कोव्ह=-२ चा संसर्ग झाल्यानंतर फॉस्फोरिलेशन नावाच्या एंझायमॅटिक प्रक्रियेमध्ये बदल झाल्याचे आढळून आले. फॉस्फोरिलेशन प्रक्रियेदरम्यान किनासे नावाच्या एन्झाईम प्रोटीनमध्ये 'फॉस्फोरिल ग्रुप' चा नव्याने समावेश होतो. हा ग्रुप पेशी- पेशींमधील संप्रेषण, पेशींच्या वाढीसह अनेक पेशी प्रक्रियेच्या नियमनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांच्या मते, होस्ट प्रोटीनमध्ये फॉस्फोरिलेशन प्रक्रियेच्या माध्यमातून बदल केल्यानंतर विषाणू इतर पेशींमध्ये आपले संक्रमण फैलावतो आणि नवनवीन पेशींना देखील नियंत्रणात घेण्यात उत्तेजन देऊ शकतो.

संशोधकांच्या अभ्यासादरम्यान आढळून आले की, विषाणूच्या संपर्कात आलेल्या एकूण प्रोटिन्सपैकी १२ टक्के प्रोटिन्समध्ये बदल घडून आले. तसेच ज्या संभाव्य किनासे एन्झाईममध्ये हे नियमन होण्याची शक्यता असते तेच एन्झाईम विषाणूची क्रिया थांबविण्यासाठी आणि कोविड-१९ ला आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे संभाव्य लक्ष्य आहेत.

ईएमबीएल-ईबीआयच्या ग्रुप लीडर आणि संशोधन अभ्यासाच्या सह लेखिका पेड्रो बेल्टारॉ यांनी सांगितले की, “पेशींचे मूलभूत कार्य असलेल्या विभाजन प्रक्रियेला हे विषाणू चाप लावून ही क्रिया एका विशिष्ट बिंदूवर त्यांना रोखून ठेवतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकृती निर्माण करण्यात आणि या क्रियेसाठी पोषक आणि स्थिर वातावरण तयार करण्यात त्यांना यश येते”.

संशोधकांनी अभ्यासाअंती काढलेल्या महत्त्वपूर्ण निष्कर्षानुसार, सार्स-कोव्ह-२ संक्रमित पेशी लांब फांदया किंवा हात फैलावून जो भाग कवेत येतो किंवा फिलोपोडियाप्रमाणे विस्तारतात. ज्यामुळे त्यांना शरीरातील जवळपास असलेल्या पेशींमध्ये विषाणूचे संक्रमण करण्यास मदत होते आणि संसर्गाचा वेग वाढविता येतो.

मात्र, या निष्कर्षांचे प्रमाणीकरण करण्यासाठी पुढील अभ्यासाची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

यूसीएसएफचे संशोधक आणि संशोधन अभ्यासाचे सह लेखक नेव्हान क्रोगन म्हणाले, “फिलोपिडियाच्या विस्तृत शाखांचे ठळक दृश्य पुन्हा एकदा स्पष्ट करते की विषाणू-होस्ट परस्परसंवादाचे जीवशास्त्र समजून घेतल्यास कोविड-१९ रोगाला रोखण्यासाठीचे संभाव्य बिंदू शोधण्यास मदत होऊ शकते".

अभ्यासादरम्यान, अमेरिकन फूड अ‌ॅन्ड ड्रग्स अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) द्वारे मंजूर केलेली आणि केनासे एन्झाईमवर वापरली जाणारी डझनभर औषधे देखील शोधली आहेत. ते म्हणाले की यातील सात संयुगे, जी प्रामुख्याने कॅन्सर विरोधी आणि दाहक रोग संयुगे आहेत, ती प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये कोविड विषाणूला विरोध करणारी अँटीव्हायरल क्रिया दर्शवितात.

"औषधांच्या शोधासाठी वापरण्यात आलेल्या डेटा-संचालित दृष्टिकोनानुसार, जी औषधे शोधण्यात आली आहेत ती कोविड-१९ विरोधातील लढाई लढण्यासाठी स्वतः सक्षम आहेत तर काही औषधे इतर औषधांबरोबर मिळून घेतल्यास कोविडला रोखू शकतात. परिणामी या महामारीला रोखणे शक्य आहे", असे क्रोगन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.