ETV Bharat / sukhibhava

Sleeping Effect On Body : जास्त झोप घेणे ठरू शकते रोगाला आमंत्रण तर कमी झोप घेण्याचा 'हा' आहे धोका - झोप मोडणे

कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक असते, मात्र जास्त झोप घेणेही हानिकार असल्याचा दावा बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यामुळे तुम्हीही कमी किवा जास्त झोप घेत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. वाचा काय आहे बर्गन विद्यापीठातील संशोधकांचा दावा.

Sleeping Effect On Body
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 5, 2023, 1:00 PM IST

वॉशिंग्टन : झोप हा मानवी आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक घटक आहे. मात्र अती झोप घेणे किवा कमी झोप घेणे मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांसह कमी झोप घेणाऱ्या नागरिकांचाही सर्व्हे केला. त्यातून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे जास्त झोप घेणे किवा कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

जास्त झोप घेणाऱ्यांना संसर्ग : बर्गन विद्यापीठातील डॉ इंगेबोर्ग फोर्थन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यावेळी डॉ फोर्थन यांनी आम्हाला जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास करायचा होता. त्यामुळे असा संबंध पाहिला असता, या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. याबाबतचे संशोधन फ्रंटियर्स इन सायकियाट्रीमध्ये प्रकाशित झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

झोपेच्या त्रासामुळे वाढतो संसर्गाचा धोका : बर्गन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जास्त झोप घेणाऱ्या नागरिकांना अँटीबॉयोटिक्स घ्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे. झोपेच्या त्रासांमुळे संसर्गाचा धोका वाढतो असा दावा या संशोधकांनी केला आहे. याबाबतचे पुरावे आधीच अस्तित्वात असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. झोप मोडणे किवा निद्रानाश हा सगळीकडे असलेली साधारण समस्या आहे. या समस्येचे निदान करने सहज सोपे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र जर नागरिकांना संसर्गाची लागण झाली तर मग त्यांना अँटीबॉयोटीक्स घ्यावे लागत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सरासरी योग्य झोप घेणाऱ्यांना सर्दी किवा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचेही यावेळी डॉ फोर्थन यांनी स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यात कोणता संसर्ग झाला याचा केला अभ्यास : डॉ फोर्थन यांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थ्याना एक प्रश्नावली देऊन नॉर्वेमधील तब्बल 1 हजार 848 नागरिकांकडून सर्वेक्षण गोळा केले. सर्वेक्षणांमध्ये नागरिकांना त्यांच्या झोपेच्या विषयक प्रश्न विचारण्यात आले होते. यात ते किती वेळ झोपतात, त्यांना किती चांगले वाटते आणि ते कधी झोपणे पसंत करतात यासह त्यांना मागील तीन महिन्यात कोणता संसर्ग झाला होता का, यात त्यांनी कोणते अँटीबॉयोटिक्स वापरले आदी प्रश्नांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश होता. यात निद्रानाश आजार ओळखणारे प्रमाण देखील होते. त्यामुळे नागरिकांना झोप जास्त झाल्यामुळे त्रास झाला की कमी झोपेमुळे त्रास झाला, याबाबतची माहिती मिळाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

कमी झोपेमुळे होतो निद्रानाशाचा आजार : सहा तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्या नागरिकांना निद्रानाशाचा आजार बळावत असल्याचा धोका असल्यााच दावा बर्गन विद्यापीठात झालेल्या या संशोधनातून करण्यात आला आहे. जे नागरिक कमी झोप घेतात त्यांना २७ टक्के संसर्ग होण्याचा धोका असतो, तर जे नागरिक ९ तासापेक्षाीह जास्त झोपतात त्यांना तर संसर्ग होण्याचा धोका ४४ टक्के असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला. त्यामुळे जास्त झोप घेणे धोक्याचे आहे. तसेच कमी झोप घेणेही धोक्याचे असल्याचा या संशोधनातून दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा - Heart Attack And Cardiac Arrest: हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय असतो फरक; 'हे' उपाय करून राहा निरोगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.