ETV Bharat / sukhibhava

Valentine Week : 'या' कारणामुळे साजरा करतात 'रोझ डे', जाणून घ्या महत्व - गुलाबाचे रंग काय संदेश देतात

प्रेमीयुगुल आणि मित्रपरिवार वर्षभर आपले प्रेम व्यक्त करत असले तरी तरीही काही जोडपी व्हॅलेंटाईन वीकमध्ये आपले प्रेम व्यक्त करतात. आज जगातील प्रत्येक देशात व्हॅलेंटाइन वीकची क्रेझ आहे. यात रोझ डे ही आहे. जाणून घ्या रोझ डेचे महत्व.

Valentine Week
रोझ डे
author img

By

Published : Feb 6, 2023, 1:57 PM IST

Updated : Feb 7, 2023, 6:35 AM IST

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना येताच तरुणाईवर व्हॅलेंटाईन वीकचा उत्साह पाहायला मिळतो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने होते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला कोणत्याही रंगाचा गुलाब देऊन आपले हृदय व्यक्त करण्याची संधी आहे. गुलाबाचा प्रत्येक रंग स्वतःची कहाणी सांगतो. रोझ डेवर केवळ तरुण-तरुणीच किलबिलाट करताना दिसत असले तरी प्रत्येकजण हा दिवस साजरा करू शकतो.

रोज डे मागील कारण : व्हॅलेंटाईन सप्ताह 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोज डे व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे 7 फेब्रुवारी. या दिवशी तरुणाई गुलाब देऊन प्रेम आणि मैत्री व्यक्त करतात. फुलांचा राजा गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याचे विविध सुंदर रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. म्हणूनच या दिवशी प्रेमी युगुल आपले प्रेम व्यक्त करतात. तुम्हीही वेगवेगळ्या रंगांचे गुलाबाचे फुल देऊन तुमच्या भावना व्यक्त करा.

अशी परंपरा सुरू झाली : रोझ डेच्या दिवशी लाल गुलाब देण्याची परंपरा फार जुनी असल्याचे सांगितले जाते. गुलाब हे शतकानुशतके रोमान्सचे प्रतीक आहे. असे म्हणतात की, मुघल सम्राट जहांगीरची बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाब खूप आवडायचे. म्हणूनच जहांगीर नूरजहानला खूश करण्यासाठी गुलाबाची फुले भेट म्हणून पाठवत असे. असेही मानले जाते की, राणी व्हिक्टोरियाच्या काळात जोडपे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाब देत असत.

गुलाबाचे रंग काय संदेश देतात? :

  1. लाल गुलाब - प्रेम व्यक्त करणे
  2. गुलाबी गुलाब - मैत्री मजबूत करणे
  3. पिवळा गुलाब - मैत्रीसाठी द
  4. केशरी रंगाचा गुलाब - तुमच्या मनात काय आहे ते समोरच्याला सांगण्यासाठी
  5. पांढरा गुलाब - एखाद्याला पटवून द्यायचे असेल तर

व्हॅलेंटाईन आठवड्याचे दिवस :

  1. 7 फेब्रुवारी 2023 - रोझ डे - मंगळवार
  2. 8 फेब्रुवारी 2023 - प्रपोज डे - बुधवार
  3. 9 फेब्रुवारी 2023 - चॉकलेट डे - गुरुवार
  4. 10 फेब्रुवारी 2023 - टेडी डे - शुक्रवार
  5. 11 फेब्रुवारी 2023 - प्राॅमीस डे - शनिवार
  6. 12 फेब्रुवारी 2023 - हग डे - रविवार
  7. 13 फेब्रुवारी 2023 - किस डे - सोमवार
  8. 14 फेब्रुवारी 2023 - व्हॅलेंटाईन डे - मंगळवार

हेही वाचा : Why Valentine Day Celebrated : व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तुम्हाला क्वचितच माहित असेल हा इतिहास

Last Updated : Feb 7, 2023, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.