हैदराबाद : सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात रोजा अर्थात उपवास करण्यात येतो. त्यामुळे सध्या मुस्लीम बांधवांचा रोजा म्हणजेच उपवास करण्याचा हा महिना सुरू असून तो खूप पवित्र असल्याचे मानण्यात येतो. रमजान महिन्यात ईद असल्याने या महिन्यात मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करतात. भारतात ईद 22 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी रोजा समाप्त करण्यात येतो. या ईदला ईद उल फित्र असे म्हणण्यात येऊन चंद्र दर्शनानंतर ईद साजरी करण्यात येते.
काय आहे पवित्र रमजान महिना : मुस्लीम बांधव रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर रोजा अर्थात उपवास करतात. हा उपवास सहेरीनंतर किंवा इफ्तारनंतर काहीही खाण्यास चालत नाही. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद उल फित्र साजरी करण्यात येते. त्या दिवशी रोजा सोडण्यात येतो. मुस्लीम समाजातील मोहम्मद पैगंबर यांना याच महिन्यात कुराणाची आयेते मिळाल्याचा उल्लेख मुस्लीम धर्मग्रंथात करण्यात येतो. त्यामुळे या महिन्याचा अत्यंत पवित्र मानले जाते. मुस्लीम बांधव या महिन्याचा उत्कठतेने वाट पाहतात.
काय आहे ईद उल फित्रचा इतिहास : मोहम्मद पैगंबरांनी कुराणचे रहस्योद्घाटन या रमजान महिन्यात केल्याने या दिवसाला खूप महत्व आहे. रमजान महिन्यातील रोजाचा उपवास या दिवशी समाप्त होतो. त्यामुळे ईद उल फित्रला मोठे महत्वाचे मानण्यात येते. या दिवशी शव्वाल महिन्याची सुरुवात होत असल्याचेही मानण्यात येते. त्यामुळे नकारात्मक विचार, नकारात्मक कार्य, नकारात्मक शब्द आदी सगळ्यांपासून दूर राहून एक यशस्वी महिना साजरा केल्याचा उत्सव ईद उल फित्रच्या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
कधी साजरी करण्यात येणार आहे ईद उल फित्र : रमजान महिन्यातील रोजा यशस्वी झाल्याचा आनंद महिन्याचा शेवटी साजरा करण्यात येतो. त्या दिवसाला ईद उल फित्र असे संबोधले जाते. त्यामुळे या दिवसाला मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी भारतात ईद उल फित्र शुक्रवार 21 एप्रिल किवा शनिवार 22 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. यात चंद्र दर्शनावर ईद साजरी करण्याचा नियम असल्याने चंद्र दर्शन न झाल्यास ईद दुसऱ्या दिवशीही साजरी करण्यात येते. त्यामुळे शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास ईद उल फित्र 21 एप्रिलला साजरी करण्यात येईल. मात्र शुक्रवारी चंद्रदर्शन न झाल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 22 एप्रिलला ईद उल फित्र साजरी करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
हेही वाचा - World Earth Day 2023 : जागतिक वसुंधरा दिन का साजरा करण्यात येतो, वाचा वसुंधरा दिनाचा इतिहास