ETV Bharat / sukhibhava

Radish Health Benefits : हृदय निरोगी ठेवण्यापासून ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत, 'हे' आहेत मुळा खाण्याचे फायदे

Radish Health Benefits : भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. जे गंभीर आजारांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. मुळा ही या भाज्यांपैकी एक आहे. मुळा आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. बहुतेक लोक सलाडच्या स्वरुपात मुळा खातात. याशिवाय मुळ्याचे पराठेही करता येतात.

Radish Health Benefits
मुळा खाण्याचे फायदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:45 AM IST

हैदराबाद : Radish Health Benefits निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हिरव्या भाज्या, धान्यं, फळं यासह अनेक गोष्टींचा आहारात समावेश करुन तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. या आरोग्यदायी पदार्थांमध्ये मुळ्याचाही समावेश आहे. हे खाल्ल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. मुळ्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-ए, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

मुळ्याचे फायदे :-

मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते : मुळा फायबरनं समृद्ध आहे. त्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. तसेच, जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर मुळा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुळा खाल्ल्यानं हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात मुळा अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता आणि भाजी म्हणून देखिल खाऊ शकता.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी मुळा फायदेशीर : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळं तुम्ही हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडू शकता. त्यामुळं तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता. मुळ्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ज्यामुळं हृदय निरोगी राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

बीपीच्या रुग्णांसाठी मुळा फायदेशीर : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मुळा फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात मुळा समाविष्ट करू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मुळा उपयुक्त : मुळ्यात व्हिटॅमिन-सी आढळतं. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. दररोज मर्यादित प्रमाणात मुळा खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

त्वचेसाठी मुळा फायदेशीर : मुळा भरपूर प्रमाणात पोषक आहे. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. सुंदर त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही मुळ्याचा रस देखील पिऊ शकता. मुळामध्ये जीवनसत्त्वे, फॉस्फरस, झिंक यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळं त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा :

  1. Heal to cracked heels : भेगा पडलेल्या टाचांना बरं करण्यासाठी करा 'हे' उपाय...
  2. Benefits of mosambi juice : मोसंबीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत; 'या' समस्या दूर करण्यात होते मदत
  3. Tulsi Oil Benefits : केसांच्या समस्येपासून हैराण आहात? वापरून पाहा तुळशीचं तेल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.