ETV Bharat / sukhibhava

Pseudomonas Infection : स्यूडोमोनास संसर्गामुळे आरोग्याचे होऊ शकतात मोठे नुकसान, जाणून घ्या त्याचे लक्षणे... - मूत्रमार्गात संसर्ग

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, प्रतिजैविक औषधांना (antibiotic drugs) प्रतिरोधक जीवाणू आतड्यातून फुफ्फुसासारख्या महत्त्वाच्या अवयवापर्यंत पोहोचू शकतात. तेथे गंभीर संसर्ग होऊ शकतात. स्युडोमोनास प्रजातीमुळे होणाऱ्या जीवाणूजन्य संसर्गास स्यूडोमोनास संसर्ग (pseudomonas infection) म्हणून ओळखले जाते. हे जिवाणू पर्यावरणामध्ये व्यापक रूपात आढळतात त्यामुळे हे एक सामान्य संक्रामक जीव आहेत. स्यूडोमोनासच्या जवळपास 200 प्रजाती आहेत.

pseudomonas infection
स्यूडोमोनास संसर्ग
author img

By

Published : Nov 25, 2022, 3:00 PM IST

वॉशिंग्टन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, प्रतिजैविक औषधांना प्रतिरोधक जीवाणू आतड्यातून फुफ्फुसासारख्या महत्त्वाच्या अवयवापर्यंत पोहोचू शकतात. तेथे गंभीर संसर्ग होऊ शकतात. स्युडोमोनास प्रजातीमुळे होणाऱ्या जीवाणूजन्य संसर्गास स्यूडोमोनास संसर्ग (pseudomonas infection) म्हणून ओळखले जाते. हे जिवाणू पर्यावरणामध्ये व्यापक रूपात आढळतात त्यामुळे हे एक सामान्य संक्रामक जीव आहेत. स्यूडोमोनासच्या जवळपास 200 प्रजाती आहेत. शास्त्रज्ञांनी 'स्यूडोमोनास एरुगिनोसा' (Pseudomonas aeruginosa) या जीवाणूच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीवर संशोधन केले ज्यामुळे प्रतिजैविक-प्रतिरोधक स्थितीमध्ये (AMR) होते.

मूत्रमार्गात संसर्ग : मूत्रमार्गात संसर्ग झाल्याचा संशय होता आणि त्यावर मेरोपेनेमने उपचार केले गेले. तथापि, स्यूडोमोनास आणि त्याच्या आतड्यांमधील उत्परिवर्तन वाढले. उपचार चालू असताना ते फुफ्फुसात पसरले आणि न्यूमोनिया झाला. संशोधकांनी सांगितले की, हे समजल्यानंतर आणि त्यावर उपचार केल्यानंतर, रोगप्रतिकारक शक्तीने प्रतिसाद दिला आणि पीडिता बरी झाली. आतड्यांतील एएमआर-उद्भवणारे बॅक्टेरिया लवकर शोधणे आणि निर्मूलन केल्याने रुग्णांना जीवघेणा आजार होण्यापासून वाचवता येईल. (Urinary tract infection)

स्यूडोमोनास संसर्ग म्हणजे काय? : स्युडोमोनास प्रजातीमुळे होणाऱ्या जीवाणूजन्य संसर्गास स्यूडोमोनास संसर्ग (pseudomonas infection) म्हणून ओळखले जाते. हे जिवाणू पर्यावरणामध्ये व्यापक रूपात आढळतात त्यामुळे हे एक सामान्य संक्रामक जीव आहेत. स्यूडोमोनासच्या जवळपास 200 प्रजाती आहेत.

स्यूडोमोनास संसर्गाचे लक्षणे :

घसा : डोकेदुखी,ताप, घसा खवखवणे, त्वचेला रॅशेस, गळ्यातील लिम्फ नोड सूजणे

कान : कानामध्ये वेदना, ऐकण्यात अडचण, कानातून पिवळा / हिरवा स्राव आणि कान मध्ये जळजळ / खाज.

मूत्रमार्ग : मूत्रातून रक्त, लघवी करताना वेदना आणि जळजळीची संवेदना, आणि धुकट/गडद रंगाचे मूत्र.

बॅक्टीरियाच्या संसर्गाच्या शोधात पुढील निदान उपाय उपयुक्त असतात: 1. पायोसियानिन फॉर्मेशन

बहुतेक प्रकरणांमध्ये पायोसायनिन तयार केले जाते, जे पसाला निळसर हिरवे बनवते. 2.फ्लोरोसेन चाचणी

वूड अल्ट्राव्हायलेट लाईट मधून बघताना संक्रमित क्षेत्र फ्लोरोसेंट दिसून येईल.

मुख्य कारणे: शस्त्रक्रिया किंवा जळण्याच्या जखमा. अंतर्निहित रोग किंवा इम्यूनोसप्रेसंट्स थेरपीमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे. युरिनरी कॅथेटर्ससारख्या साधनांचा वापर. ब्रिदींग मशीनवर वापरणारी व्यक्ती.

उपाय : योग्य अलगाव प्रक्रिया. कॅथेटर आणि इतर साधनांची पुरेशी साफसफाई. जखमांवर स्थानिक अँटीबॅक्टीरियल क्रीम आणि लोशन वापरून उपचार करणे. योग्य असेप्टिक तंत्रांचे पालन करणे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.