ETV Bharat / sukhibhava

२०२० मध्ये मानसिक आजारी व्यक्तींची संख्या झाली दुप्पट!

author img

By

Published : Dec 26, 2020, 6:30 AM IST

जवळपास एक वर्षापासून जगभरात कोविड-१९ने धुमाकुळ घातला आहे. याच्या लोकांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरात मानसिक आजारी व्यक्तींची संख्या झाली दुप्पट आहे.

Mental Illnesses
मानसिक आजार

हैदराबाद - दर वर्षी अनेक कारणांमुळे मानसिक आजारांमध्ये वाढ होत असते. पण मानसिक आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करणारा एकमेव रोग म्हणजे कोविड १९. सुरुवातीला या आजाराचा आपल्याला संसर्ग होईल या भीतीपासून ते बेरोजगारी, आर्थिक संकट, भविष्याची अनिश्चितता सगळ्यालाच लोकांनी तोंड दिले. या साथीच्या रोगामुळे जगभर नैराश्य, अस्वस्थता आणि तणाव याचा अनुभव लोकांनी घेतला. त्याच वेळी ज्यांना पार्किन्सन, अल्झायमर, डायमेनशिया हे मज्जसंस्थेचे आजार आहेत, त्यांना लाॅकडाऊनमुळे योग्य औषधे न मिळाल्याने अतिशय त्रास सहन करावा लागला. याशिवाय वैवाहिक कलह आणि घरगुती हिंसाचाराची प्रकरणही नोंदवण्यात आली आणि लोक मानसशास्त्रज्ञांकडे मदतीसाठी गेले. या वर्षी मानसिक आजाराचा गंभीर परिणाम लोकांवर झाला.

ताण आणि औदासिन्यात वाढ -

कोविड १९ चा उद्रेक सुरू झाला, रुग्ण वाढले आणि देशांनी लाॅकडाऊन घोषित केले. त्यामुळे लोकांना आरोग्य आणि आर्थिक समस्या भेडसावायला लागल्या. शिवाय लाॅकडाऊनमुळे घराबाहेर पडण्याची कोणाला परवानगी नव्हती. त्यामुळे लोकांना वाटले की ते जणू तुरुंगातच अडकले आहेत आणि त्याने नैराश्यात झपाट्याने वाढ झाली.

विषाणूची लागण झालेल्यांमध्ये नैराश्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसून आले. भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, कोविड १९ मधील जवळपास ३० % रुग्णांना नैराश्य आणि चिंता यांनी ग्रासले होते. शिवाय घरी लोकांना एकमेकांसोबत राहणे भाग पडले. त्यांच्या मध्ये असलेल्या असंतोषामुळे घरगुती हिंसाचार वाढला आणि कौटुंबिक कलह निर्माण झाला. यामुळेही लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य जास्त वाढले.

आश्चर्य म्हणजे केवळ प्रौढच नव्हे तर मुलेही चिंता आणि नैराश्याचे बळी ठरले. शाळा व महाविद्यालये बंद करणे, ऑनलाईन वर्ग, २४ तास घरी रहाण्याची सक्ती यामुळे चिंता, अस्वस्थता, दबाव वाढणे, नैराश्य इत्यादी स्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती इतकी गंभीर होती की बर्‍याच राज्य सरकारने पुढाकार घेऊन मुलांसाठी ऑनलाईन समुपदेशन सत्र सुरू केले.

आत्महत्यांमध्ये वाढ -

आकडेवारीनुसार जगभरातले जवळ जवळ ८ लाख लोक आणि आपल्या देशातले जवळ जवळ २ – ३ लाख दर वर्षी आत्महत्या करतात. पण २०२० मध्ये आत्महत्त्येचे प्रमाण दुप्पट झाले. यामागचे कारण म्हणजे नैराश्य, निराशा आणि अनिश्चितता. या आत्महत्यांमध्ये काही लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही स्टार्सही होते. सर्व वयोगटातील लोकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यातले गांभीर्य लक्षात घेता राज्य आणि देश पातळीवरचे अनेक मानसोपचार तज्ज्ञ एकत्र आले. आणि लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन समुपदेशन सुरू केले.

अस्तित्वाची लढाई आणखी बिघडली

अनेक देशांमध्ये लाॅकडाऊनमुळे औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, डिमेंशिया आणि पर्किन्सन या आजारग्रस्त रुग्णांच्या समस्येत वाढ झाली. कारण त्यांना औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत. यातच भर म्हणून मानसोपचार संस्था बंद झाल्या आणि मानसिक आजारांवर उपचार घेत असलेल्या व्यक्तींना योग्य औषधेही मिळाली नाहीत. त्यामुळे समस्या वाढल्या.

निद्रानाशाच्या प्रकरणांमध्ये वाढ

घर, कामाचे ठिकाण आणि वैयक्तिक आयुष्य यात वाढलेल्या तणावामुळे सर्व वयोगटातल्या लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावू लागली. या वर्षाच्या आकडेवारीनुसार निद्रानाशाच्या रुग्णांमध्ये १० टक्के ते ३३ टक्के वाढ झाली. ती तिप्पट आहे.

फोबियामध्ये वाढ

या वर्षी प्रतिकुल परिस्थितीमुळे लोक जास्त घाबरले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा फोबिया झाला. मग सर्व गोष्टी निर्जंतुकीकरणाचा फोबिया असो, किंवा घराबाहेर पडण्याचा. हा रोग जीवघेणा असल्याने लोक जास्त घाबरायला लागले.

म्हणूनच या वर्षी जवळ जवळ प्रत्येक जण एक किंवा अनेक मानसिक आजाराचा बळी पडलाच. मग तो सौम्य असो वा तीव्र. घरी विषाणू येऊ नये म्हणून अतिरेकी स्वच्छता आणि अनेकदा निर्जंतुकीकरण याचे वेडच लागले. निर्बंध शिथिल केल्यानंतरही अनेक जणांनी घरीच राहणे पसंत केल्याने त्यांचा एकटेपणा वाढला. आपण आशा करू २०२१ हे नवे वर्ष नक्कीच आनंदी जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.