ETV Bharat / sukhibhava

पौष अमावस्येपासून पितरांना मिळते मोक्ष; काय आहे आख्यायिका ?

Paush Amavasya 2024 : पौष अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी आहे. ही अमावस्या पितरांना मोक्ष देणारी मानली जाते. या दिवशी काही काम केल्यानं पितरांचा आशिर्वाद मिळतो, असं मानलं जातं.

Paush Amavasya 2024
पौष अमावस्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:47 AM IST

Updated : Jan 11, 2024, 9:15 AM IST

हैदराबाद : वर्षातील पहिली अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी आहे. प्रत्येक महिन्याची अमावस्या तिथी खूप महत्त्वाची असली तरी पौष आणि अमावस्या हे दोन्ही पितरांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पौष अमावस्येचं महत्त्व दुप्पट होतं. पौष अमावस्येला काही विशेष कर्म केल्यानं यमलोकातील पितरांच्या यातनांपासून मुक्ती मिळते, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळते. पौष अमावस्येला काय करावे ते जाणून घेऊया.

  • पौष अमावस्या 2024 तारीख आणि वेळ: पंचांग नुसार, पौष अमावस्या तिथी 10 जानेवारी रोजी रात्री 8.10 वाजता सुरू होईल. त्यानंतर 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 05.26 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी आहे.
  • पौष अमावस्येच्या दिवशी काय करावे : पौष अमावस्येला तर्पण, पिंड दान, पवित्र नदीत स्नान, पितरांच्या नावानं दान करावे. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात.
  • पौष अमावस्येचे उपाय : पौष अमावस्येच्या दिवशी गरजूंना अवश्य जेवू घालावे. त्यांना देणगी द्यावी. असं केल्यानं शुभ फळ मिळतं असे मानले जाते. याशिवाय पितरांना तृप्त करण्यासाठी अमावस्या तिथीला पिंड दान करावे. असं केल्यानं पितरांच्या आशीर्वादानं घरात समृद्धी राहते.

पौष अमावस्येला या 4 गोष्टी करा

  • यावेळी करा श्राद्ध : पितरांचे श्राद्ध करण्यासाठी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की अमावस्येला दुपारी पूर्वज त्यांच्या वंशजांमध्ये येतात. त्यांच्याकडून पाणी आणि अन्न मिळण्याची आशा करतात. अशा स्थितीत यावेळी केलेले श्राद्ध सात पिढ्यांतील पितरांना तृप्त करते. पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो.
  • हे दान पितृदोषापासून मुक्ती देईल : योग्य व्यक्तीला दिलेले दान कीर्ती, यश आणि सौभाग्य सोबत निश्चित फळ देते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पौष अमावस्येला अन्न, तांदूळ, दूध, तूप, घोंगडी, धन दान करावे. पितृदोषामुळे जीवन संकटांनी घेरले जाते, पण अमावस्येला केले जाणारे श्राद्ध विधी त्यातून मुक्ती मिळते, असे म्हणतात. त्यातून वंश वाढतो.
  • पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पूर्ण होईल काम : अनेक वेळा पितृदोष किंवा पितरांच्या नाराजीमुळे कुटुंबाची प्रगती थांबते. शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. अशा स्थितीत पौष अमावस्येला पाण्यात दूध, तांदूळ आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा. यामुळे जीवनातील अंधार नाहीसा होतो. शनिही प्रसन्न होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने कुटुंबात प्रगती होते.
  • स्नान : पौष अमावस्येला गंगा नदीत किंवा घरात गंगाजल टाकून स्नान करावे. याचा परिणाम आरोग्यावर होतो. पितरांसाठी नैवेद्य दाखवावा.

(डिसक्लेमर : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक मान्यतेवर आधारित आहे. ई टीव्ही भारत यासंदर्भात कोणतीही पुष्टी करत नाही.)

हेही वाचा:

  1. 'मिसोफोनिया'नं होवू शकतो व्यक्ती रागीट किंवा आक्रमक; नेमका काय आहे 'हा' आजार?
  2. मूडलेस फिल होतय ? खावून पहा 'हे' पदार्थ, बदलू शकतो मूड
  3. प्रवासी भारतीय दिन 2024 : जगभरात अनिवासी भारतीयांचा 'डंका', जाणून घ्या प्रवासी भारतीय दिनाचा इतिहास

Last Updated : Jan 11, 2024, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.